फक्त 10 वी उत्तीर्ण उमेदवारांना सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 484 जागेसाठी मेगाभरती !

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ central bank of india megabharati ] : आपण जर राष्ट्रीयकृत बँकेत नोकरी करु इच्छित असाल तर , आणि आपण फक्त 10 वी उत्तीर्ण असाल तर आपणांसाठी सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये तब्बल 484 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत , तरी दिनांक 27 जुन पर्यंत इच्छुकांनी अर्ज सादर करुन घ्यावेत .

कोणत्या पदासाठी भरती आहे ? : यांमध्ये सफाई कामगार ( वर्ग – 4 ) , कार्यालयीन कर्मचारी अथवा सब स्टाफ पदांच्या एकुण 484 जागेसाठी मेगाभरती राबविली जात आहे .

शिक्षण किती हवे ? : वरील पदांसाठी आपणांकडे फक्त 10 वी पर्यंतचे शिक्षण हवे असणार आहेत , जो कोणी इयत्ता 10 वी उत्तीर्ण असेल , असे उमेदवार आवेदन सादर करण्यास पात्र ठरेल .

अर्ज करताना उमेदवाराचे वय किती असायला हवे ? : दिनांक 31 मार्च 2023 या तारखेला उमेदवाराचे किमान वय हे 18 वर्षे पुर्ण असायला हवेत , तर जास्तीत जास्त वय हे 26 वर्षे इतके असावेत ( जनरल / ओबीसी साठी ) .. यांमध्ये आपण जर SC / ST प्रवर्गांमध्ये असाल तर आपणांसाठी यांमध्ये 05 वर्षे व OBC या प्रवर्गांमध्ये असल्यास , आपणांस 03 वर्ष सुट दिली जाणार आहे .

अर्जाची शुल्क : अर्ज करताना आपणांकडून जनरल / ओबीसी साठी 850/- रुपये ऑनलाईन पद्धतीने चलन भरावे लागेल , तर ST/SC/EX-SM / PWD व महिला प्रवर्गातील उमेदवारांना 175/- रुपयांचे चलन भरावे लागतील .

ऑनलाईन अर्ज / भरती जाहीरात पाहण्यासाठी CLICK HERE

Leave a Comment