राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या शाळांच्या या वेळांमध्येच भरणार ; या शैक्षणिक वर्षांपासुन नियम लागु !

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ state all school timeing news ] : राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या शाळांच्या वेळा बाबत राज्य शासनांकडून महत्वपुर्ण निर्देश देण्यात आलेले आहेत . सदरच्या वेळा ह्या राज्यातील इयत्ता चौथी पर्यंतच्या वर्गांकरीता लागु असणार आहेत .

यंदाच्या शैक्षणिक वर्षांपासून राज्यातील सर्वच व्यवस्थापनाच्या इयत्ता 4 थी पर्यंतच्या शाळा ह्या 9 वाजता अथवा त्यानंतरच भरविण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत . यांमध्ये पुर्व प्राथमिक वर्गांकरीता (नर्सरी , एलकेजी ,युकेजी )  सदर नियम लागु असणार आहेत , शिक्षणांसाठी लहान मुलांची झोपमोड होवू नयेत , हा प्रमुख उद्देश डोळ्यांसमोर ठेवून , सदरचा निर्णय राज्य शासनांकडून घेण्यात आलेला आहे .

9 नंतर शाळा भरण्याचे कारणे : राज्याचे राज्यपाल यांनी एका भाषणांमध्ये नमुद केल्याप्रमाणे सध्याच्या आधुनिक युगांमध्ये आपल्या जीवन शैलीत अमुलाग्र असे बदल झालेले आहेत .सध्या मनोरंजनाचे आधुनिक साधने उपलब्ध झालेले आहेत , बहुदा शहरी भागांमध्ये मुले ध्वनीप्रदुषण अशा समस्यांमुळे रात्री उशिरापर्यंत झोपत नाहीत , तर शाळा ह्या सकाळच्या वेळांमध्ये असल्यास विद्यार्थ्यांची झोप मोड होवून मानसिक आरोग्यावर अनेक परिणाम होतात .

यामुळे राज्यातील सर्वच जिल्ह्यातील तसेच सर्वच व्यवस्थापनांच्या ( शासकीय , निमशासकीय , अनुदानित , विना अनुदानित ) अशा सर्व प्रकारच्या शाळांच्या वेळा ह्या सन 2024-25 या शैक्षणिक वर्षांपासुन पुर्व प्राथमिक ते इ. 4 थी पर्यंतचे वर्ग हे सकाळी 9 वाजता अथवा त्यानंतर भरविण्याचे निर्देश राज्य शासनांकडून देण्यात आलेले आहेत .

तर ज्या शाळांना आपल्या वरील वर्गांकरीता वेळांमध्ये बदल करणे शक्यच नसतील तर आपल्या अडचणींबाबतचा सविस्तर प्रस्ताव संबंधित जिल्हा शिक्षणाधिकारी यांच्याकडे सादर करावा , त्यांच्या पुर्व परवानगी शिवाय वरील नमुद वर्ग हे 9 पुर्वी भरविण्यात येवू नयेत , अशा प्रकारचे निर्देश देण्यात आलेले आहेत .

Leave a Comment