@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ share Market investment update ] : शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करणाऱ्या करणाऱ्यांसाठी आताशी मोठी महत्त्वपूर्ण अपडेट समोर येत आहे , ती म्हणजे शेअर बाजारामध्ये आणखीन उतरता आलेख पाहायला मिळणार असल्याचा अंदाज तज्ञांनी दिला आहे .
तज्ञांनी दिलेल्या अंदाजानुसार शेअर बाजारामध्ये आणखीन उतरता आलेख दिसून येणार आहे , कारण भारतीय बाजारातील विदेशी गुंतवणूक हळूहळू मोठ्या प्रमाणात कमी होत आहे . यामुळेच शेअर बाजार उतरत्या स्थितीवर आहे . आज रोजी शेअर बाजारामध्ये सलग पाचव्या दिवशी उतरता आलेख दिसून आला आहे .
आज रोजी निफ्टी अंकामध्ये 35 अंकांची घसरण होऊन निफ्टी 23,523 अंकावर व्यवहार करत आहे . तर सेन्सेक्स मध्ये आज 163.03 अंकांची घसरण पाहायला मिळाली व सेन्सेक्स 77,527 अंकावर व्यापार करीत आहे . यामुळेच भारतीय बाजारातील गुंतवणूकदारांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागत आहे .
झी बिझनेसचे ( अँकर – Zee Business) शेअर मार्केट तज्ञ अनिल सिंघवी यांनी दिलेल्या माहितीनुसार , शेअर बाजार घसरण्याची ही तिसरी स्टेज आहे . याचे मुख्य कारण देताना म्हणाले की अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर फक्त अमेरिकन मार्केटमध्ये मोठी वाढ दिसून येत आहे , तर इतर देशाच्या मार्केटला उतरती कळा लागल्या आहेत .
तर विदेशी गुंतवणूकदार अमेरिकन मार्केटमध्ये गुंतवणूक करीत आहेत . ज्यावेळी अमेरिकन शेअर बाजारात घसरण होईल , त्यावेळेस भारतीय शेअर मार्केटमध्ये चढता आलेख दिसून येईल , असा अंदाज आहे.
शेअर बाजारामध्ये आणखीन घट होईल , या भीतीने गुंतवणूकदार तोट्यामध्येच पैसे काढत असल्याने , शेअर बाजारामध्ये आणखीन घसरता आलेख दिसून येत आहे . अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांनी “वेट अँड वॉचची” भूमिका घेऊनच नव्याने गुंतवणूक करावी , असा सल्ला तज्ञांनी दिला आहे .
- शेअर मार्केटमध्ये तेजी कधी येणार ? जाणून घ्या मार्केट तज्ञ , मोतीवाल ओसवाल यांचे भविष्य !
- सरकारी कर्मचाऱ्यांना 40 दिवसांच्या अतिरिक्त वेतन बोनससह , वाढीव भत्ताचा लाभ !
- शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट ; मार्केट आणखीन घसरण्याचा अंदाज !
- राज्यात महायुती सरकार राबवित असणाऱ्या काही महत्त्वपूर्ण नवीन योजना ; सत्तांतर झाल्यास बंद पडण्याची भीती ..
- पुढील 48 तासात राज्यातील “या” जिह्यात , वाऱ्यासह पावसाची शक्यता !