@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ government employee extra pay bonus and mahagai Bhatta ] : केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना 40 दिवसांचे अतिरिक्त वेतन बोनससह , वाढीव महागाई भत्ताचा लाभ अनुज्ञेय करण्यात आलेला आहे . यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या एकुण सॅलरीमध्ये मोठी वाढ झालेली आहे .
सदरचा 40 दिवस बोनस चा लाभ सैन्य दलातील अधिकारी / कर्मचाऱ्यांनाच दिला जात होता , परंतु आता इतर केंद्रीय कर्मचाऱ्यांना याचा लाभ दिला जात आहे . यांमध्ये आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स अंतर्गत येणाऱ्या अधिकारी / कर्मचाऱ्यांना सदर लाभ दिला जाणार आहे . सदर लाभ देण्याकरीता देशाच्या राष्ट्रपतीची मंजूरी मिळालेली आहे .
वरील नमुद अधिकारी / कर्मचाऱ्यांना सदर बोनसचा लाभ हा PLB ( Productivity Linked Bonus अंतर्गत दिला जाणार आहे . सदर बोनस हा कर्मचाऱ्यांच्या 40 दिवसांच्या पगारा इतका असणार आहे .तर अस्थायी कर्मचाऱ्यांकरीता प्रति महा 1200/- रुपये गणना करण्यात येणार आहे .
वाढीव डी.ए चा लाभ : केंद्र सरकारने नुकतेच दि.01.07.2024 पासुन वाढीव महागाई भत्ता लागु करण्यात आलेला आहे , यांमध्ये सातवा वेतन आयोगानुसार डी.ए मध्ये 03 टक्के वाढ करण्यात आलेली आहे , म्हणजेच एकुण डी.ए हा 50 वरुन 53 टक्के इतका झाला आहे .
याशिवाय सहावा वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्यांना डी.ए ही 239 टक्के वरुन 246 टक्के अशी वाढ करण्यात आलेली आहे , तसेच पाचवा वेतन आयोगानुसार डी.ए मध्ये 443 टक्के वरुन 455 टक्के अशी वाढ करण्यात आलेली आहे .
- राज्यातील अनुदानित शाळांना अनुदान वितरीत करण्यास प्रशासकीय मान्यता GR निर्गमित दि.21.03.2025
- अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या गट विमा योजनाच्या वर्गणीबाबत , वित्त विभागांकडून महत्वपुर्ण GR निर्गमित दि.21.03.2025
- आता जादा कामासाठी या शासकीय कर्मचाऱ्यांना अतिरिक्त सुधारित मानधन ; GR निर्गमित दि.21.03.2025
- मार्च पेड इन एप्रिल वेतन देयक अदा करणेबाबत निधीचे वितरण ; शासन निर्णय निर्गमित दि.20.03.2025
- शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे अंशदान व शासनाचा हिस्सा व कर्मचाऱ्यांच्या अंशदान यावरील व्याज रक्कम अदा करणेबाबत परिपत्रक दि.11.03.2025