सामाजिक न्याय विभाग : संजय गांधी निराधार योजना अंतर्गत कोणास लाभ मिळतो , अर्ज कसा करावा , किती आर्थिक मिळते ? जाणून घ्या सविस्तर ..

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Sanjay Gandhi Niradhar Yojana ] : संजय गांधी निराधार योजना ही योजना सरकारच्या सामाजिक न्याय विभाग ( Samajik ) अंतर्गत राबविण्यात येते , या योजनाबाबत आपणांस अधिक सविस्तर माहिती या लेखांमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत ..

या योजनाचे प्रमुख उद्देश : सदर संजय गांधी निराधार योजनांचे प्रमुख उद्देश म्हणजे समाजामधील दुर्बल घटकांना अर्थ सहाय्य करणे होय ..

सदर योजना अंतर्गत कोण- कोणास लाभ मिळतो ( लाभार्थी ) : सदरच्या योजना अंतर्गत दिव्यांग , विधवा , अनाथ , दुर्धर अजारग्रस्त , आत्याचारित महिला , देवदासी , तुरुंगातून शिक्षा भोगत असणाऱ्या कुटुंब प्रमुखाच्या पत्नी , वेश्या व्यवसायातुन मुक्त महिला , 35 वर्षांवरील अविवाहीत निराधार स्त्री , इ. दुर्बल निराधार घटक लाभ घेवू शकतील ..

योजनाचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे : सदरच्या योजना अंतर्गत आपणांस वयाचा दाखला यांमध्ये किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे 65 वर्षे दरम्यान तर 18 पेक्षा कमी वय असणाऱ्या लाभार्थ्यांना पालकांमार्फत लाभ दिला जाईल , तसेच राज्यांमध्ये 15 वर्षांपासुनचा रहिवाशी दाखला , विधवा असल्यास पतीचा मृत्यु दाखला , दिव्यांग असल्यास जिल्हा शल्य चिकित्सकांचा ( किमान 40 टक्के अपंग ) दाखला , अनाथ दाखला ..

तसेच उत्पन्नाचा दाखला , दुर्धर आजार प्रमाणपत्र , दिव्यांगाकरीता वार्षिक उत्पन्न मर्यादा ही 50,000/- रुपये तर इतर सर्व लाभार्थ्यांकरीता कमाल वार्षिक उत्पन्न मर्यादा ही 21,000/- रुपये इतकी असेल , तसेच रेशनकार्ड , आधारकार्ड , निवडणूक ओळखपत्र , बँक पासबुक झेरॉक्स , रहिवाशी दाखला , पासपोर्ट फोटो ..

मिळणारे आर्थिक लाभ : सदर योजना अंतर्गत आपले अर्ज मंजुर झाल्यास लाभार्थ्यांस प्रतिमहा 1500/- रुपये इतके आर्थिक लाभ थेट बँक खात्यांमध्ये जमा केले जाते ..

अर्ज कसा करावेत ? : आपण जर या योजना अंतर्गत लाभ घेवू इच्छित असाल तर आपल्या तहसील कार्यालयाच्या सेतु केंद्र अथवा ऑनलाईन पद्धतीने https://aaplesarkar.mahaonline.gov.in/  या संकेतस्थळावर आवेदन सादर करावेत ..

Leave a Comment