@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी : बळीराजांकडून बऱ्याच दिवसांपासून प्रतिक्षेत असणारा मान्सुन अखेर देशांमध्ये दाखल झाला आहे , तर राज्यांमध्ये हळू – हळू मान्सुन सक्रिय होणार असल्याचा हवामान अंदाज भारतीय हवामान खात्यांकडून देण्यात आलेला आहे .
आज दिनांक 30 मे 2024 रोजी देशातील केरळ राज्यांमध्ये मान्सुनने दमदार एन्ट्री केल्याची माहिती समोर येत आहे , तर सदर नैऋत्य मौसमी वाऱ्यांपासुन पडणारा पाऊसाची हलकी सरी राज्यातील कोकणांमध्ये दिसून आल्या , परंतु राज्यांमध्ये अद्याप मान्सुन सक्रिय झालेला नाही . भारतीय हवामान खात्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार देशातील केरळ व ईशान्य भारतांच्या बऱ्याच भागांमध्ये मान्सुनने आज रोजी एन्ट्री केली आहे .
भारतीय हवामान खात्यांकडून दिलेल्या अंदाजानुसार केरळ मध्ये दिनांक 31 मे रोजी मान्सुन येईल अशी शक्यता होती , परंतु एक दिवस अगोदरच मान्सुनने हजेरी लावली आहे . तर महाराष्ट्रांमध्ये दिनांक 10 जुन पर्यंत मान्सुन येण्याचा अंदाज व्यक्त केला आहे , परंतु काही हवामान तज्ञांनी सांगितले कि महाराष्ट्रात दिनांक 08 जुन रोजी मान्सुनचे आगमन होईल .
तर राज्यांमध्ये पश्चिम महाराष्ट्रात दिनांक 15 जुन 2024 पर्यंत मान्सुन सक्रिय होवून पुढे मराठवाडा व विदर्भामध्ये मान्सुनची एन्ट्री होईल , याकरीता 20 जुन पर्यंतचा अवधी लागुन जाईल असा अंदाज हवामान तज्ञांकडून देण्यात आला आहे .
मान्सुनची दमदार एन्ट्री : केरळमध्ये आज दि.30 मे रोजी मान्सुनने दमदार एन्ट्री केली आहे , यामुळे देशातील बळीराजाला मोठा आनंद झाला आहे . मान्सुनच्या आगमनामुळे सदर भागातील उष्णतेची प्रमाणे कमी होण्यास सहाय्यभूत होत आहेत .
-
01 जुलै पासुन 04 जुलै पर्यंत राज्यात पावसाची दमदार सुरुवात ; IMD कडून या जिल्ह्यांना तुफान पावसाची शक्यता !
Spread the love@marathiprasar चंदना पवार प्रतिनिधी [ Heavy rains to start in the state from July 1 to July 4 ] : दिनांक 01 जुलै ते 04 जुलै पर्यंत राज्यात काही जिल्ह्यांना भारतीय हवामान खात्यांकडून तुफान पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे . सविस्तर अंदाज पुढीलप्रमाणे पाहुयात . 01 जुलै रोजीचा अंदाज : हवामान खात्याने दिलेल्या…
-
राज्य कर्मचाऱ्यांना “ही” योजना लागु करणेबाबत ; वित्त विभागांकडून GR निर्गमित दि.30.06.2025
Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Regarding implementation of this scheme for state employees; GR issued by Finance Department on 30.06.2025 ] : राज्य कर्मचाऱ्यांना निर्णयांमध्ये नमुद योजना लागु करणेबाबत , वित्त विभागांकडून दिनांक 30.06.2025 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर शासन निर्णयानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , राज्य…
-
लहानपणांपासुनच इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे बालपण तर हरवतच आहे ; तसेच मुलांच्या बुद्धांक वाढीवर देखिल होतोय विपरित परिणाम !
Spread the love@marathiprasar चंदना पवार प्रतिनिधी [ Adverse effects of English medium schools ] : सध्या राज्यातच नव्हे तर देशातच इंग्रजी माध्यमांच्या शाळांना मोठी पसंती दिली जात आहे . कारण देशांमध्ये स्वदेशी भाषांपेक्षा इंग्रजीचे महत्व अधिक आहे . आपल्या देशांमध्ये काही लोकं इंग्रजीमध्ये बोलतील पण आपल्या स्वदेशी हिंदी भाषेचा विरोध करतील , हे वास्तव असल्याने…