Sangita Pawar प्रतिनिधी [ Salary arrears approved for retired/voluntarily retired employees; know the detailed decision. ] : काल दिनांक 27 मे रोजी राज्याचे मा.मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षेखाली झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत निवृत्त / स्वेच्छा निवृत्त कर्मचाऱ्यांना वेतन थकबाकी मंजूर करण्यास मंजुर देण्यात आली आहे .
सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी मंजुर : सदर मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार राज्य हातमाग महामंडळ , नागपुर महाराष्ट्र राज्य मधून निवृत्त 195 कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी मंजूर करण्यात आलेली आहे .
या संदर्भात माहे जुलै 2024 मध्ये झालेल्या बैठकीत सदर कर्मचाऱ्यांना थकबाकी देण्याची मागणी करण्यात आलेली होती . परंतु महामंडळाची आर्थकि स्थिती कमकुवत असल्याने याबाबत अनुदान उपलब्ध करुन देण्यात आलेले नव्हते .
हे पण वाचा : NTPC अंतर्गत विविध पदांच्या 180 रिक्त जागेसाठी पदभरती !
परंतु सदर मंत्रीमंडळ बैठकीत सदर 195 निवृत्त / स्वेच्छा निवृत्त कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे .
या निर्णयानंतर निवृत्त कर्मचाऱ्यांना दि.01.04.2006 ते दिनांक 25.11.2014 या काळातील 6 व्या वेतन आयोगाची थकबाकी करीता तब्बल 11,90,69,463/- रुपये ( 11 कोटी , 90 लाख 69 हजार 463 रुपये ) इतकी रक्कम वितरीत करण्यास मंजुरी देण्यात आली आहे .
- पुढील 24 तासांमध्ये राज्यातील “या” जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी ; जाणून घ्या सविस्तर अंदाज !
- गिरीश महाजन यांनी डॉ. बाबासाहेबांचे नाव न घेतल्याने , झालेल्या वादावरून माधवी यांचे निलंबन होणार का ? पाहा सविस्तर नियम !
- राज्यातील “या” 15 दिग्गजांना पुरस्कार जाहीर ; जाणून घ्या सविस्तर यादी .
- नविन वेतन आयोगाचे पे – मॅट्रिक्स झाले निश्चित ; जाणून घ्या पगारातील वाढ !
- राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दि.19.01.2026 रोजी 05 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय (GR) निर्गमित .