@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ According to the new Finance Act 2025 approved in Parliament, there will be a reduction in DA and Pay Commission of pensioners. ] : पेन्शन धारकांसाठी आत्ताची मोठी धक्कादायक बातमी समोर येत आहे , संसदेत नुकतेच नविन वित्तीय कायदा 2025 मंजूर करण्यात आला आहे .
सदर वित्तीय कायदा 2025 नुसार पेन्शन धारकांना मिळणार महागाई भत्ता व नविन वेतन आयोगाचा लाभ विसरावा लागणार आहे . सदर नविन वित्तीय कायदा 2025 नुसार पेन्शन धारकांच्या पेन्शनची जबाबदारी ही सरकारची असणार नसल्याचे सदर कायद्यांमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे .
डी.ए व नविन वेतन आयोगावर रोख : सदर कायद्यानुसार आता पेन्शन धारकांना महागाई भत्ता व नविन वेतन आयोग लाभ आता सेवानिवृत्तांसाठी नसणार आहे . यांमध्ये निवृत्ती वेतन धारक यांच्या डी.ए तसेच नविन वेतन आयोग संदर्भात सरकारकडून स्वतंत्र रित्या निर्णय घेतला जाईल , अशा प्रकारची तरतुद करण्यात आलेली आहे .
राज्य / केंद्र सरकारच्या पेन्शन धारकांना पेन्शन कायदा 1972 नुसार पेन्शन लाभ दिला जातो , तर दि.17.12.1982 रोजी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र / राज्य सरकारच्या पेन्शनधारक तसेच सरकारी कर्मचारी यांमध्ये भेदभाव न करता डी.ए व वेतन आयोग लाभ देण्याचा ऐतिहासिक निर्णय दिला होता .
हे पण वाचा : 12 वी पात्रताधारकांसाठी महाभरती !
नविन वित्तीय कायदा 2025 : नविन वित्तीय कायद्यानुसार निवृत्तीवेतन धारकांना नविन वेतन आयोग लागु असणार नाही , याशिवाय पेन्शन नियम 1972 चे पेन्शन कायद्याचे नियम / लाभ लागु असणार नाहीत , याशिवाय जुनी पेन्शन योजनानुसार लाभ घेणाऱ्यांना देखिल नविन वेतन आयोगाचा लाभ अनुज्ञेय होणार नाही .
याशिवाय डी.ए संदर्भात सरकारकडून स्वतंत्र निर्णय घेतल्यानंतरच डी.ए लाभ दिला जाईल , अन्यथा डी.ए अनुज्ञेय केला जाणार नाही . या संदर्भात पेन्शन धारकांना न्यायालयांमध्ये दाद मागता येणार नाही .
- पुढील 03 महिन्यात सोन्याचे भाव गगणाला भिडणार ; जाणून घ्या सविस्तर आकडेवारी !
- Rain Update : पुढील 48 तासात राज्यातील या जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जारी ; जाणून घ्या सविस्तर हवामान अंदाज !
- राज्य कर्मचारी / अधिकारी संदर्भात दि.13 जुन रोजी निर्गमित करण्यात आले 02 महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR )
- महाराष्ट्र पेन्शनर्स : पेन्शन धारकांसाठी आत्ताची मोठी अपडेट ; पेन्शनर्स असोसिएशन , पुणे मार्फत प्रसिद्धपत्रक निर्गमित !
- दि.10 जुन 2025 रोजी झालेल्या राज्य मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण कॅबिनेट निर्णय !