@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Revised pay fixation will be done on these 04 major components in the 8th Pay Commission ] : केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना दि.01.01.2026 पासुन सुधारित वेतन आयोग लागु करण्याच्या अनुषंगाने आठवा वेतन आयोग स्थापन करण्यास केंद्र सरकारने मंजूरी दिली आहे . सदर आठवा वेतन आयोग हा खाली नमुद 04 घटकावर अवलंबून राहणार आहेत .
फिटमेंट फॅक्टर : सर्व वेतन आयोगातील सुधारित वेतननिश्चिती ही फिटमेंट फॅक्टरवर अवलंबून असते . फिटमेंट फॅक्टर किती पटांनी वाढविण्यात आले आहेत , यानुसार मुळ वेतनात वाढ करण्यात येत असते . सातवा वेतन आयोग हे 2.57 पट फिटमेंट फॅक्टर प्रमाणे वेतननिश्चिती करण्यात आलेल्या होत्या , तर आता आठवा वेतन आयोग हे 2.57 ते 2.86 पट फिटमेंट फॅक्टर पर्यंत वेतननिश्चिती होवू शकते .
समान पद / समान वेतन : सातवा वेतन आयोगांमध्ये समान काम / समान वेतनावर अधिक भर नव्हता , जसे कि दोन वेगवेगळ्या विभागांमध्ये समान काम करणाऱ्या पदांस वेगळ्या वेतनश्रेण्या आहेत . यामुळे आठवा वेतन आयोगांमध्ये सर्वच विभागाचा एकत्रित विचार करुन समान वेतन लागु करण्यात येणार आहेत .
पदोन्नतीच्या पदांचा विचार : कर्मचाऱ्यांच्या त्यांच्या सेवा काळांमध्ये पदोन्नतीच्या संधी खुप कमी प्रमाणात मिळत आहेत . ज्यामुळे त्यांच्या वेतनश्रेणी विपरीत परिणाम होतो , यामुळे जरी पदोन्नतीचा संधी न मिळाले तरी पदोन्नतीच्या पदाचे वेतन स्वयंचलित पद्धतीने वेतनेश्रणीत वेतन अंगिकृत करण्याचा विचार करण्यात येणार आहेत .
इतर देय वेतन / भत्त्यात करण्यात येईल वाढ : आठवा वेतन आयोग लागु झाल्यास , महागाई भत्याचे दर परत शुन्य टक्के करण्यात येईल , तर इतर देय असणाऱ्या भत्यात जसे कि , वाहन भत्ता , घरभाडे भत्ता मध्ये वाढ करण्यात येईल .
- राज्य कर्मचाऱ्यांना 3 वर्षातुन 10 दिवस मिळते या कामासाठी पगारी रजा ; जाणून घ्या वित्त विभागाचा शासन निर्णय !
- जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांकरीता महत्वपुर्ण राजपत्र निर्गमित दि.18.07.2025
- सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारचा रजेबाबत खास महत्वपुर्ण निर्णय ; संसदेत दिली माहिती !
- राज्य कर्मचाऱ्यांना “ही” योजना लागु करणेबाबत ; वित्त विभागांकडून GR निर्गमित दि.30.06.2025
- लहानपणांपासुनच इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे बालपण तर हरवतच आहे ; तसेच मुलांच्या बुद्धांक वाढीवर देखिल होतोय विपरित परिणाम !