@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ These are the 11 tasks that officers/employees will have to do under the Office Mobility Campaign ] : कार्यालयीन गतिमानता अभियान राबविणे करीता कार्यालय प्रमुख / कर्मचारी यांना 11 प्रकारचे कामे पार पाडावी लागणार आहेत . याबाबतचे विषय व करावयाची कार्यवाही बाबत पुढीलप्रमाणे सविस्तर जाणून घेवूयात ..
यांमध्ये कार्यालयाचे वेबसाईटचे सुगमीकरणे करण्याचे निर्देश आहेत , जेणेकरुन सर्व नागरिकांना सहज व सुलभरित्या माहिती प्रदान होईल .तसेच कार्यालयीन स्वच्छता , पिण्याचे पाणी उपलब्धता तसेच स्वच्छतागृहांची स्वच्छता ठेवणे बाबत कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
तसेच नागरिकांना सेवा सुलभ मिळण्याच्या दृष्टीने शासनांच्या 02 महत्वाकांक्षी योजनांची अंमलबजावणी करण्याचे तसेच अर्धन्यायिक प्रकारणे , चौकशी प्रकरणे , दंडाधिकारीय प्रकरणे , विविध पोर्टलवरील प्राप्त तक्रारी निर्गमित करण्याचे निर्देश आहेत .
तसेच अभ्यागतांना भेटीसाठी वेळा सुनिश्चित करणे , लोकशाही दिनाची अंमलबजावणी , गुंतवणूकीला प्रोत्साहन देणे , कार्यालयांची आवश्यक डागडुजी व निगा राखणे , तसेच क्षेत्रीय भेटींचे पुर्वनियोजन करुन त्यानुसार क्षेत्रभेटी देणे , तसेच ई- ऑफिसचा परिपुर्ण वापर व अभिलेखे अद्ययावत करणे , याशिवाय अधिकारी / कर्मचारी संवाद कार्यक्रमाचे आयोजन करणे अशा प्रमुख विषयांवर कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .
याबाबत पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग मार्फत दि.20.01.2025 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून डाऊनलोड करण्यासाठी Click Here
- आज दिनांक 20 मार्च रोजीच्या काही प्रमुख चालु घडामोडी ; जाणुन घ्या सविस्तर !
- सरकारी कर्मचाऱ्यांनी सोशल मिडीया वापर करणेबाबत सरकारकडून कठोर नियमावली – मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून निर्देश !
- अवेळी पाऊस यामुळे शेतीपिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत निधी जाहीर ; GR दि.19.03.2025
- वाहतुकीचे नियम मोडल्यास असे असतील आत्ताचे सुधारित दंड !
- राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आज दिनांक 19.03.2025 रोजी निर्गमित झाला महत्वपुर्ण शासन निर्णय !