@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Revised GR regarding implementation of Senior/Promotional (Single Level) Pay Scale for Teaching/Non-Teaching Employees issued on 04.06.2025 ] : शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना वरिष्ठ / पदोन्नतीची ( एकस्तर ) वेतनश्रेणी लागु करणेबाबत राज्य शासनांच्या इतर मागास बहुजन कल्याण विभाग मार्फत दिनांक 04.06.2025 रोजी सुधारित शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर शासन निर्णयांमध्ये नमुद करण्यात आले आहेत कि , दि.13.03.2020 रोजीच्या शासन निर्णयानुसार , नक्षलग्रस्त तसेच आदिवासी क्षेत्रांमध्ये इतर बहुजन कल्याण विभाग अंतर्गत स्वयंसेवी संस्थामार्फत चालविण्यात येणाऱ्या वि.जा.भ.ज प्रवर्गाच्या खाजगी अनुदानित निवासी आश्रमशाळांमधील कार्यरत शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना एकस्तर पदोन्नतीची योजना ( मुळ पदाच्या नजिकची वरीष्ठ / पदोन्नतीची वेतनश्रेणी ) लागु करण्यास मान्यता देण्यात येत आहे .
नक्षलग्रस्त / आदिवासी क्षेत्रात इतर मागास बहुजन कल्याण विभाग अंतर्गत स्वयंसेवी संस्था मार्फत चालविण्यात येणाऱ्या विजाभज प्रवर्गाच्या खाजगी अनुदानित निवासी आश्रमशाळांमधील शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना कालबद्ध पदोन्नती / आश्वासित प्रगती योजना अथवा एकस्तर पदोन्नती योजना या दोन्ही योजनांपैकी प्रथम ज्या योजना अंतर्गत तो लाभ मिळण्यास पात्र ठरेल , कारण सदर दोन्ही योजना अंतर्गत मिळणार आर्थिक लाभ ( समान वेतनश्रेणी ) समान आहे .
यामुळे एका योजना अंतर्गत लाभ मिळाल्यानंतर दुसऱ्या योजना अंतर्गत वेगळ्याने लाभ देणे अभिप्रेत नाही , त्यानुसार पदोन्नतीच्या वरिष्ठ पदाच्या वेतनश्रेणीचा लाभ देण्यात यावा असे नमुद करण्यात आले आहेत . तसेच त्यानंतर भविष्यात सदर कर्मचारी ज्या वेळी दुसऱ्या योजना अंतर्गत लाभ मिळण्यास पात्र ठरे , त्यावेळेस तो आधीपासुन पदोन्नतीच्या वरिष्ठ पदाची वेतनश्रेणी घेत असल्यास ,त्यास दुसऱ्या योजना अंतर्गत वेगळ्याने तोच लाभ अनुज्ञेय होणार नाही असे स्पष्ट करण्यात आले आहेत .
हे पण वाचा : असा मिळेल सुधारित वेतनश्रेणीचा लाभ !
तसेच नक्षलग्रस्त / आदिवासी क्षेत्रांमध्ये आदिवासी म्हणून घोषित करण्यात आलेले गावे / इतर मागास बहुजन कल्याण विभाग अंतर्गत स्वयंसेवी संस्थामार्फत चालविण्यात येणाऱ्या विजाभज प्रवर्गाच्या खाजगी अनुदानित निवासी आश्रमशाळांतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना एकस्तर पदोन्नती योजना मंजूर करणे संदर्भात कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
या संदर्भातील सविस्तर GR पुढीलप्रमाणे पाहु शकता ..
- राज्य कर्मचाऱ्यांना 3 वर्षातुन 10 दिवस मिळते या कामासाठी पगारी रजा ; जाणून घ्या वित्त विभागाचा शासन निर्णय !
- जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांकरीता महत्वपुर्ण राजपत्र निर्गमित दि.18.07.2025
- सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारचा रजेबाबत खास महत्वपुर्ण निर्णय ; संसदेत दिली माहिती !
- राज्य कर्मचाऱ्यांना “ही” योजना लागु करणेबाबत ; वित्त विभागांकडून GR निर्गमित दि.30.06.2025
- लहानपणांपासुनच इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे बालपण तर हरवतच आहे ; तसेच मुलांच्या बुद्धांक वाढीवर देखिल होतोय विपरित परिणाम !