@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ State employees will get the benefit of revised pay scale; Know the terms/conditions of the Finance Department – GR ] : राज्य कर्मचाऱ्यांना खुल्लर समितीने केलेल्या सुधारित वेतनश्रेणीचा लाभ देण्यास राज्य शासनांच्या दिनांक 02.06.2025 रोजीच्या शासन निर्णयानुसार मंजूरी देण्यात आलेली आहे .
सदर सुधारित वेतनश्रेणीचा लाभ अनुज्ञेय करताना काही प्रमुख अटी / शर्ती सदर शासन निर्णयांमध्ये नमुद करण्यात आलेल्या आहेत . सदर शासन निर्णयातील नमुद जोडपत्र 01 व जोडपत्र 02 मध्ये नमुद करण्यात आलेल्या पदांना सुधारित वेतनश्रेणी लागु करण्यात आलेली आहे .
सदर कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनस्तर हे दिनांक 01.01.2016 पासुन काल्पनिक रित्या लागु करण्यात आलेले आहेत , परंतु प्रत्यक्ष आर्थिक लाभ हे दिनांक 01.06.2025 पासुन लागु करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत . यामुळे यांमध्ये कोणत्याही प्रकारच्या थकबाकीचा विचार असणार नाही .जुन 2025 च्या वेतनापासुन प्रत्यक्ष सुधारित वेतनस्तर लागु करण्यात येणार आहेत .
निवृत्त कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनस्तराचा असा मिळणार लाभ : दिनांक 01.01.2016 ते दिनांक 31.05.2025 या कालावधीमध्ये जे कर्मचारी निवृत्त झाले आहेत , अशा कर्मचाऱ्यांना सदर कालावधीत काल्पनिक रित्या वेतनवाढी लागु करुन वेतनिश्चिती करुन सुधारित निवृत्तीवेतन लागु करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .
सदर सुधारित निवृत्तीवेतनाचे प्रत्यक्ष लाभ हे दिनांक 01.06.2025 पासुनच देण्याचे निर्देश देण्यात आले असून , त्यापुर्वीची थकबाकी अनुज्ञेय होणार नसल्याचे नमुद करण्यात आले आहेत .
या संदर्भातील वित्त विभागाचा सविस्तर GR पाहण्यासाठी Click Here
- पुढील 03 महिन्यात सोन्याचे भाव गगणाला भिडणार ; जाणून घ्या सविस्तर आकडेवारी !
- Rain Update : पुढील 48 तासात राज्यातील या जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जारी ; जाणून घ्या सविस्तर हवामान अंदाज !
- राज्य कर्मचारी / अधिकारी संदर्भात दि.13 जुन रोजी निर्गमित करण्यात आले 02 महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR )
- महाराष्ट्र पेन्शनर्स : पेन्शन धारकांसाठी आत्ताची मोठी अपडेट ; पेन्शनर्स असोसिएशन , पुणे मार्फत प्रसिद्धपत्रक निर्गमित !
- दि.10 जुन 2025 रोजी झालेल्या राज्य मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण कॅबिनेट निर्णय !