@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Rainfall forecast between 25 and 28 June ] : राज्यात दिनांक 25 ते 28 जुन दरम्यानच्या काळात राज्यातील हवामान अंदाज पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..
हवामान खाते व हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी दिलेल्या अंदाजानुसार पुढील 5 दिवस राज्यात सर्वदुर पाऊस पडणार आहे , परंतु सर्वच भागांमध्ये पाऊस पडणार नसुन भाग बदलुन पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे .
कोकण विभागातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पाऊस सुरुच राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असुन , पुढील 5 दिवस संपुर्ण विदर्भाला पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे . तसेच खानदेश मधील धुळे , जळगाव , नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये पुढील 4 दिवस जोरदार पाऊस राहणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे .
याशिवाय बीड ,परभणी , हिंगोली , लातुर , धाराशिव या जिल्ह्यांतील काही भागांमध्ये किरकोळ स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे .
हे पण वाचा : महाराष्ट्रात हे 21 नविन जिल्हे निर्माण करणे प्रस्तावित ..
दिनांक 28 जुन नंतर हवामानामध्ये पुन्हा एकदा बदल होणार असून , पावसाचा नव्याने सुरुवात होणार आहे . सध्या 28 जुन पर्यंत मराठवाडा , विदर्भ भागांमध्ये पावसाच्या हलक्या सरी बरसणार आहेत .
- राज्य कर्मचाऱ्यांना 3 वर्षातुन 10 दिवस मिळते या कामासाठी पगारी रजा ; जाणून घ्या वित्त विभागाचा शासन निर्णय !
- जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांकरीता महत्वपुर्ण राजपत्र निर्गमित दि.18.07.2025
- सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारचा रजेबाबत खास महत्वपुर्ण निर्णय ; संसदेत दिली माहिती !
- राज्य कर्मचाऱ्यांना “ही” योजना लागु करणेबाबत ; वित्त विभागांकडून GR निर्गमित दि.30.06.2025
- लहानपणांपासुनच इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे बालपण तर हरवतच आहे ; तसेच मुलांच्या बुद्धांक वाढीवर देखिल होतोय विपरित परिणाम !