@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Rainfall forecast between 25 and 28 June ] : राज्यात दिनांक 25 ते 28 जुन दरम्यानच्या काळात राज्यातील हवामान अंदाज पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..
हवामान खाते व हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी दिलेल्या अंदाजानुसार पुढील 5 दिवस राज्यात सर्वदुर पाऊस पडणार आहे , परंतु सर्वच भागांमध्ये पाऊस पडणार नसुन भाग बदलुन पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे .
कोकण विभागातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पाऊस सुरुच राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असुन , पुढील 5 दिवस संपुर्ण विदर्भाला पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे . तसेच खानदेश मधील धुळे , जळगाव , नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये पुढील 4 दिवस जोरदार पाऊस राहणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे .
याशिवाय बीड ,परभणी , हिंगोली , लातुर , धाराशिव या जिल्ह्यांतील काही भागांमध्ये किरकोळ स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे .
हे पण वाचा : महाराष्ट्रात हे 21 नविन जिल्हे निर्माण करणे प्रस्तावित ..
दिनांक 28 जुन नंतर हवामानामध्ये पुन्हा एकदा बदल होणार असून , पावसाचा नव्याने सुरुवात होणार आहे . सध्या 28 जुन पर्यंत मराठवाडा , विदर्भ भागांमध्ये पावसाच्या हलक्या सरी बरसणार आहेत .
- शिक्षकांसाठी धक्कादायक बातमी ; टीईटी परीक्षा दि.31.08.2026 पर्यंत उत्तीर्ण व्हावीच लागणार – विधी व न्याय विभागाचा अभिप्राय !
- सन 2026 या वर्षातील शाळांना सुट्टीची यादी ( दिवाळी , उन्हाळी , इतर सार्वजनिक ) ; पाहा सविस्तर !
- हिवाळी अधिवेशनांमुळे दि.13 व 14 डिसेंबर 2025 ची सुट्टी रद्द ; कार्यालये पुर्ण क्षमतेने सुरु ठेवण्याचे परिपत्रक .
- कर्मचाऱ्यांचे वैद्यकीय खर्चाची प्रतिपुर्ती मंजूर करणेबाबत महत्वपुर्ण GR निर्गमित दि.04.12.2025
- कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वपुर्ण “राईट टु डिस्कनेक्ट – 2025” विधेयक लोकसभेत सादर ; कर्मचाऱ्यांना मिळणार मोठा दिलासा !