@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Minimum percentile qualification applicable in direct service recruitment process ] : स्पर्धा परीक्षा प्रमाणेच सरळसेवा पदभरती प्रक्रिया करीता किमान पर्सेंटाईल अर्हतामान लागु करणेबाबत , महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत दिनांक 23 जुन 2025 रोजी महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर परिपत्रकानुसार नमुद करण्यात आलेले आहेत कि , आयोगाच्या दिनांक 23.04.2025 रोजी झालेल्या बैठक क्र.199 मधील निर्णय क्रमांक 4.1 नुसार निर्णय लागु करण्यात आला आहे .
यांमध्ये आयोगाच्या कार्य नियमावली मधील नियम क्र.8 ( vi ) संदर्भात दिनांक 13.01.2021 रोजीच्या सुधारणासह स्पर्धा परीक्षांप्रमाणेच सरळसेवा भरती प्रक्रिया करीता घेण्यात येणाऱ्या चाळणी परीक्षांकरीता देखिल किमान पर्सेंटाईल अर्हतामान लागु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे .
सदरचा निर्णय हा आयोग मार्फत यापुढे घेण्यात येणाऱ्या सर्व चाळणी परीक्षांकरीता लागु असणार असल्याची उमेदवारांना नोंद घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .
हे पण वाचा : डेटा एन्ट्री ऑपरेटर , लिपिक / क.सचिवालय सहाय्यक पदांच्या 3,131 जागेसाठी महाभरती !
किमान पर्सेंटाईल अर्हतामान काय आहे ? : पर्सेंटाईल म्हणजे उमेदवारांने इतर उमेदवारांच्या तुलनेत किती गुण अधिक / किती पटीने चांगली कामगिरी केली आहे हे दर्शविते . एकंदरित किमान गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचे टक्केवारी नुसार उमेदवारांची संख्या पर्सेंटाईलच्या माध्यमातुन दर्शविण्यात येणार आहे .
किमान पर्सेंटाईल अर्हतामानाचा मुख्य उद्देश म्हणजे चाळणी परीक्षेतुन सक्षम उमेदवारांची मुख्य परीक्षासाठी निवड करणे . ज्यामुळे अधिक कार्यक्षम / सक्षम उमेदवाराची निवड होण्यास सहाय्यभूत होणार आहे .

- 01 जुलै पासुन 04 जुलै पर्यंत राज्यात पावसाची दमदार सुरुवात ; IMD कडून या जिल्ह्यांना तुफान पावसाची शक्यता !
- राज्य कर्मचाऱ्यांना “ही” योजना लागु करणेबाबत ; वित्त विभागांकडून GR निर्गमित दि.30.06.2025
- लहानपणांपासुनच इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे बालपण तर हरवतच आहे ; तसेच मुलांच्या बुद्धांक वाढीवर देखिल होतोय विपरित परिणाम !
- नविन वेतन आयोग किमान फिटमेंट फॅक्टर राज्य कर्मचाऱ्यांचे किमान वेतन Pay Scale नुसार जाणून घ्या , संभाव्य वेतनश्रेणी !
- राज्यातील पेन्शनधारकांसाठी सा. प्र. विभागाचा अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय ( GR) ; जाणून घ्या सविस्तर !