@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Protest demanding cancellation of old pension, education workers ] : जुनी पेन्शन योजना पुर्ववत लागु करा , शिक्षण सेवक पद रद्द करण्यात यावे अशा मागणीकरीता महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती मार्फत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले आहेत .
सदरचे धरणे आंदोलन हे जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापुर समोर दुपारीच्या वेळेत जोरदार निदर्शनास करण्यात आले .जुनी पेन्शन , शिक्षण सेवक पद्द रद्द करण्यासह संचमान्यता बाबत दिनांक 15.03.2024 रोजीचा शासन निर्णय रद्द करण्याची तसेच आंतरजिल्हा बदली बाबत जाचक असणाऱ्या अटी रद्द करण्याची मागणी करण्यात आलेली आहे .
सदरचे आंदोलन हे राज्यभर आयोजित करण्यात आलेले होते , यांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापुर येथे मोठ्या संख्येने शिक्षक उपस्थित होते . सदर आंदोलनाचे नेतृत्व शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद तौंदकर तर सरचिटणीस प्रभाकर कमळकर त्याचबरोबर विभागीय अध्यक्ष अर्जून पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते .
सदर आंदोलनाची दखल घेत , जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी सदर आंदोलनाचे निवेदन घेतले , व शिक्षकांच्या मागण्या विचारात घेवून पुढील कार्यवाहीसाठी शासन दरबारी पोहोच करण्याचे आश्वासन देण्यात आले व आंदोलन स्थगित झाले .
- राज्य कर्मचाऱ्यांच्या रजा नियमांमध्ये सुधारणा ; वित्त विभाग शासन अधिसूचना दि.28.01.2025
- राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.31 डिसेंबर रोजी निर्गमित करण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय !
- Good News : सरकारी कर्मचाऱ्यांचा जानेवारी मध्ये परत 02% DA वाढ ; एकुण महागाई भत्ता 60 टक्के होणार !
- DA : केंद्राच्या धर्तीवर महागाई भत्ता 58% दराने लागू करणेबाबत शासन निर्णय (GR)
- कर्मचारी / पेन्शन धारकांना नविन वेतन आयोगांमध्ये कोण-कोणते फायदे मिळणार ? जाणून घ्या सविस्तर !