राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आज दिनांक 19.03.2025 रोजी निर्गमित झाला महत्वपुर्ण शासन निर्णय !

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ An important government decision was issued today, 19.03.2025, regarding state employees. ] : राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आज दिनांक 19 मार्च 2025 रोजी सामान्‍य प्रशासन विभागांकडून महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

सदर शासन निर्णयानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , शासकीय अधिकारी / कर्मचारी यांचे गोपनीय अहवाल लिहीणे व जतन करणे याबाबत सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 01.11.2011 रोजीच्या शासन निर्णयातील सुचना तसेच दिनांक 07.02.2018 रोजीच्या शासन निर्णयानुसार गट अ व गट ब ( राजपत्रित ) संवर्गातील..

 राज्य सरकारी अधिकाऱ्यांचे कार्यमुल्यमापन अहवाल सन 2017-18 या प्रतिवेदन वर्षापासून महापार या प्रणालीद्वारे ऑनलाईन लिहीण्यात यावेत अशा सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत .सदर कार्यमुल्यमापन अहवाल हे ऑफलाईन पद्धतीनेच नोंदविल्याचे आढळून आल्याने , कार्यमुल्यमापन अहवाल हे महापार या संगणक प्रणालीत नोंदविणेबाबत सर्व आस्थापना अधिकारी / संस्करण अधिकारी यांना सुचना देण्यात येत आहेत .

यानुसार आस्थापना मंडळापुढे प्रस्ताव करतांना विचारक्षेत्रातील सर्व अधिकाऱ्यांचे कार्यमुल्यमापन अहवाल हे महापार प्रणालीमध्ये ऑनलाईन पद्धतीनेच नोंदविलेले असणे आवश्यक आहे असे नमुद करण्यात आले आहेत . तसेच ऑफलाईन पद्धतीने नोंदविण्यात आलेले कार्यमूल्यमापन अहवाल दिनांक 01.09.2025 पासुन आस्थापना मंडळाच्या बैठकीत विचारात घेतले जाणार नाहीत असे नमुद करण्यात आले आहेत .

हे पण वाचा : महाराष्ट्र राज्य महसुल व वन , बांधकाम व सा.प्रशासन विभाग अंतर्गत गट अ व ब पदांच्या 385 पदांसाठी महाभरती !

तसेच सन 2017-18 या प्रतिवेदन वर्षापासून गट अ व गट ब ( राजपत्रित ) संवर्गातील अधिकाऱ्यांचे कार्यमुल्यमापन अहवाल हे महापार या प्रणालीत लिहीण्यात यावेत , अशा सुचना निर्गमित करण्यात आलेल्या होत्या , त्यामुळे सन 2017-18 पासुनचे गट अ व गट ब ( राजपत्रित ) संवर्गातील अधिकाऱ्यांचे कार्यमुल्यमापन अहवाल हे ऑनलाईन पद्धतीत..

 उपलब्ध होण्यास्तव गट अ व गट ब ( राजपत्रित ) संवर्गातील अधिकाऱ्यांचे सन 2017-18 नंतरचे ऑफलाईन पद्धतीने नमूद केलेले कार्यमुल्यमापन अहवाल स्कॅन करुन महापार प्रणालीवर अपलोड करण्यात यावेत असे नमुद करण्यात आले आहेत .

Leave a Comment