PM मातृत्व वंदना योजना अंतर्गत महिलांना मिळते , 5000/- रुपयांची आर्थिक सहाय्य ; जाणून घ्या पात्रता , अर्ज प्रक्रिया सविस्तर माहीती !

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ pm matrutva Vandana Scheme ] : प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना अंतर्गत महिलांना 5000/- रुपये इतके आर्थिक सहाय्य देण्यात येते , सदर योजना ही केंद्र सरकार मार्फत राबविण्यात येते . चला तर मग सदर योजना अंतर्गत आवश्यक असणारी पात्रता , अर्ज प्रक्रिया , व इतर सविस्तर माहिती !

आवश्यक असणारी पात्रता ( Eligibility )  : सदर पीएम मातृत्व वंदना योजना अंतर्गत गरोदर महिलांना गरोदर काळांमध्ये योग्य प्रकारे स्तनपान करण्यासाठी आर्थिक सहाय्य दिले जाते . ह्या योजनेचा फायदा देशातील सर्व गरोदर महिला लाभ घेवू शकतील . तर ही योजना महिला व बाल विकास मंत्रालय व समाज कल्याण मार्फत राबविली जाते .

अंगणवाडीमध्ये अथवा आयोग्य सुविधा केंद्रात गर्भधारणेची नोंदणी केल्यानंतर गरोदर महिलांना 1000/- रुपयांची मतद दिली जाते , त्यानंतर दुसरा हप्ता हा गर्भधारणेच्या 6 महिन्यानंतर 2000/- रुपयांचा हप्ता अदा केला जातो ,त्यानंतर 2000/- रुपयांचा तिसरा हप्ता हा मुलाच्या जन्माच्या नोंदणी नंतर / लसीकरण वेळी महिलांच्या थेट बँक खात्यांमध्ये वर्ग करण्यात येते .

या योजनांच्या माध्यमातुन पात्र महिलांना लाभ घेण्यासाठी आपल्या गावातील अंगणवाडी सेविका / आशा सेविका यांच्या संपर्क साधावा व त्यांना लागणारे आवश्यक कागदपत्रे यांमध्ये आधार कार्ड , गर्भ धारण झाल्याचे नोंद ( पुस्तिका ) व बँक खात्याची क्षेरॉक्स प्रत द्यावेत . त्यांच्या माध्यमातुन ऑनलाईन अर्ज सादर केले जाते .

जर आपल्याला विहीत कालावधीमध्ये सदर योजनांचे हप्ते प्राप्त न झाल्यास आपल्या अंगणवाडी सेविका / आशा वर्कर यांच्या संपर्क साधु शकता .

Leave a Comment