जुनी पेन्शन ( Old Pension ) योजना लागु करणेबाबत , अखेर GR निर्गमित दि.28.04.2025

Spread the love

Khushi Pawar प्रतिनिधी ( Old Pension Scheme ) – शालेय शिक्षण विभाग मार्फत दिनांक 28 एप्रिल 2025 रोजी निर्गमित शासन निर्णयानुसार , केंद्र सरकारच्या धर्तीवर दिनांक 01.11.2005 रोजी अथवा त्यानंतर राज्य शासनांच्या सेवेत रुजु झालेल्या शासन निर्णयातील नमुद पात्र कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागु करण्यास मंजूरी देण्यात आलेली आहे .

जुनी पेन्शन योजना : केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना जे कर्मचारी एनपीएस योजना लागु होण्याच्या अगोदर नोकरीची जाहीरात प्रसिद्ध झाली होती , परंतु त्यांना एनपीएस योजना लागु होण्याच्या दिनांकानंतर रुजु करण्यात आले होते , अशांना जुनी पेन्शन योजनाल लागु करण्यात येत आहेत .

केंद्र सराकरच्या याच धर्तीवर राज्य सरकारकडून दिनांक 01.11.2005 पुर्वी पदभरती करीता जाहीरात / अधिसुचना निर्गमित करण्यात आलेले परंतु त्यांना दिनांक 01.11.2005 रोजी अथवा त्यानंतर राज्य शासन सेवेत रुजु करण्यात आलेले आहेत , अशांना जुनी पेन्शन योजना लागु करण्यास अथवा विकल्प देण्यास मंजूरी देण्यात आलेली आहे .

जुनी पेन्शन योजना मधील प्रमुख आर्थिक फायदे : जुनी पेन्शन योजना ( Old Pension ) योजना मध्ये कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर शेवटच्या मुळ वेतनाच्या 50 टक्के रक्कम पेन्शन तर त्यासोबत प्रचलित महागाई भत्ता अदा करण्यात येतो . तसेच भविष्य निर्वाह निधी योजना लागु असते ,यामुळे जुनी पेन्शन योजनांच निवृत्तीनंतर फायदेशिर ठरते .

हे पण वाचा : एप्रिल पेड इन मे वेतन करीता अनुदान वितरण GR निर्गमित दि.22.04.2025

शालेय शिक्षण विभागाच्या दिनांक 28 एप्रिल 2025 रोजीच्या शासन निर्णयानुसार , शिक्षण विभागातील प्राचार्य व अधिव्याख्याता पदावरील ( ज्यांच्या पदभरतीची जाहीरात ही दिनांक 01.011.2005 पुर्वी आहे ) अशा कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागु करण्यास अखेर परवानगी देण्यात आलेली आहे .

तर वरील कर्मचाऱ्यांचे निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत खाते बंद करुन त्यावरील व्याजाची रक्कम संबंधित कर्मचाऱ्यांच्या GPF खाती तर सरकारचे योगदान सरकारच्या खाती जमा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .

या संदर्भातील सविस्तर GR डाऊनलोड करण्याकरीता Click Here

Leave a Comment