@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Important government decision regarding granting permanent certificates to temporary state employees.. ] : अस्थायी राज्य कर्मचाऱ्यांना स्थायित्व प्रमाणपत्र देणे संदर्भात सामान्य प्रशासन विभाग मार्फत दिनांक 11.09.2014 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR ) निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदरच्या शासन परिपत्रकानुसार नमुद करण्यात आलेले आहेत कि , सरकारी अधिकारी / कर्मचाऱ्यांस स्थायित्व प्रमाणपत्र प्रथम पदावरील नियुक्तीच्या बाबत शासन निर्णय / परिपत्रके करीता असणारे अस्थायी शासकीय कर्मचाऱ्यांपैकी गट अ , ब ( राजपत्रित ) अधिकाऱ्यांच्या संदर्भात संबंधित नियुक्ती प्राधिकाऱ्याने तसेच गट ब ( अराजपत्रित ) गट व गट ड कर्मचाऱ्यांच्या संदर्भात संबंधित कार्यालय प्रमुखाने स्थायित्व प्रमाणपत्र देणे आवश्यक असल्याची बाब नमुद करण्यात आलेली आहे .
स्थायित्व प्रमाणपत्राची प्रमुख 03 बाबी : कर्मचाऱ्याची नियुक्ती ही सेवाप्रवेश नियम नुसार तसेच विहीत पद्धतीने होणे आवश्यक असेल , तसेच कर्मचारी सेवेस पात्र असल्या संदर्भात वैद्यकीय प्रमाणपत्र असणे तसेच कर्मचाऱ्यांने सेवा प्रवेशोत्तर प्रशिक्षण परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असेल .
त्याचबरोबर कर्मचाऱ्याचा सेवाभिलेख ( यांमध्ये गोपनिय अहवाल , सचोटी तसेच उपस्थिती ) या बाबी चांगले असणे आवश्यक असेल . याकरीता संबंधित कर्मचाऱ्याला स्थायित्व प्रमाणपत्र मिळण्यास ज्या दिनांकापासून पात्र ठरेल त्या दिनांकापासून सदर प्रमाणपत्र देण्यात यावेत अशी बाब नमुद आहे .
तसेच एखाद्या कर्मचाऱ्याच्या संबंधात स्थायित्व प्रमाणपत्र न देण्याचा जाणीवपुर्वक निर्णय घेण्यात आला असेल , अशा प्रकरणी स्थायित्व प्रमाणपत्र न देण्यामागची कारणे नमुद करण्याचे निर्देश आहेत .
स्थायित्व प्रमाणपत्र कामकाज कालावधी : स्थायित्व प्रमाणपत्र देण्याचे कामकाज कालावधी सदर निर्णयांमध्ये नमुद करण्यात आलेला असून , सर्व मंत्रालयीन विभाग यांना खुद्द विभागालयातील त्याचबरोबर त्यांच्या प्रशासकीय नियंत्रण खाली नियुक्ती प्राधिकारी / कार्यालय प्रमुख यांच्यावरील अहवाल दिनांक 31 डिसेंबर पुर्वी संकलित करण्याचे तसेच स्थायित्व प्रमाणपत्र देणे संदर्भातील प्रकरणे देणे बाबतची प्रकरणी निर्णय घेण्यास संबंधित नियुक्ती प्राधिकारी / कार्यालय प्रमुख यांच्याकडून अकारण विलंब होणार नाही , याकडे लक्ष पुरविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .
या संदर्भातील सविस्तर GR डाऊनलोड करण्यासाठी Click Here
- पुढील 03 दिवस दि.17 , 18 व 19 मे पर्यंतचा हवामान अंदाज ; या भागांमध्ये पडणार वादळी वाऱ्यांसह अवकाळी पाऊस !
- शिक्षकांना उन्हाळी सुट्टी 1 जुन पर्यंतच ; 02 जुन ते 15 जुन पर्यंत शिक्षकांच्या प्रशिक्षणाचे आयोजन !
- पुढील 48 तासात राज्यातील या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा हवामान खात्याचा इशारा !
- दहावी पास झालात ? आता पुढे काय – जाणून घ्या दहावी नंतर नोकरीच्या अनुषंगाने महत्वपुर्ण अभ्यासक्रम !
- राज्य कर्मचाऱ्यांच्या वेतनत्रुटी निवारण नंतर कर्मचाऱ्यांच्या ह्या 02 प्रलंबित प्रस्तावित मागणीवर होणार निर्णय !