NPS धारक कर्मचाऱ्यांच्या संदर्भात वित्त विभागाचा महत्वपुर्ण शासन निर्णय ; पाहा सविस्तर !

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ nps employee imp Shasan nirnay ] : एनपीएस धारक कर्मचाऱ्यांच्या संदर्भात वित्त विभागांकडून दिनांक 27 डिसेंबर 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

सदरच्या निर्णयानुसार , परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना / एनपीएस प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्याचा सेवा कालावधीत मृत्यु झाल्यास , त्यांच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्तीवेतन व मृत्यु उपदान व रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांला रुग्णता निवृत्तीवेतन व सेवानिवृत्ती उपदान तसेच शासन सेवेतुन निवृत्त झालेल्या तसेच होणाऱ्या कर्मचाऱ्यांना निवृत्ती उपदान अनुज्ञेय करण्याच्या अनुषंगाने स्पष्टीकरण देण्यात आले आहेत .

सदर निर्णयानुसार नमुद करण्यात आले आहे कि , दिनांक 01 एप्रिल 2023 पुर्वी मृत्यु झालेल्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांकडून दिनांक 31 मार्च 2023 रोजी शासन निर्णयासोबत जोडण्यात आलेला नमुना 03 मधील विकल्पाची प्रत तसेच दिनांक 01 एप्रिल 2023 रोजी अथवा नंतर मृत्यु झालेल्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत संबंधित कार्यालयाने वित्त विभाग शासन निर्णय दिनांक 31.03.2023 नुसार सादर करण्यात आलेल्या नमुना – 02 / नमुना – 03 कुटुंब निवृत्तीवेतनाच्या प्रस्तावासोबत महालेखापाल कार्यालयाकडे सादर करताना …

आहरण व संवितरण अधिकारी / सक्षम प्राधिकाऱ्यांकडून प्रमाणित करुन सादर करणे आवश्यक राहील , असे नमुद करण्यात आलेले आहेत . तसेच दिनांक 31.03.2023 रोजीच्या शासन निर्णयानुसार सानुग्रह अनुदान योजना बंद करण्यात आलेली आहे .त्यामुळे दिनांक 01 एप्रिल 2023 पुर्वी मृत्यु पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सानुग्रह अनुदान देण्यात आले आहेत किंवा नाही याबाबतचे प्रमाणपत्र प्राप्त करुन घेवून प्रस्तावासोबत महालेखापाल कार्यालयास पाठविणे आवश्यक आहे ..

जेथे कायदेशिर वारस / कुटुंब निवृत्तीवेतन धारकांना एनपीएस / डीसीपीएस अंतर्गत जमा झालेला निधी अदा केला गेला नाही , तेथे एनपीएस / डीसीपीएस मधील शासनाचे अंशदान व त्यावरील व्याज शासन खात्यात भरणा केल्याच्या नंतर निवृत्तीवेतन प्रकरणे महालेखापाल कार्यालयाकडे सादर करताना शासनाचे अंशदान शासन खात्यात जमा केल्याबाबत प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील असे नमुद करण्यात आलेले आहेत .

याबाबत सविस्तर निर्णय डाऊनलोड करण्यासाठी Click Here

Leave a Comment