MSRTC : बस महामंडळाच्या बसने आवडेल तेथे कोठेही करा प्रवास तेही फक्त 1170/- रुपयांच्या पासमध्ये !

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ msrtc travel where you like scheme pass ] : राज्य शासनांच्या महाराष्ट्र राज्‍य मार्ग परिवहन महामंडळ मार्फत आवडेल त्या ठिकाणी कोठेही प्रवास करण्यासाठी “आवडेल तेथे कोठेही प्रवास” ही प्रवास सुविधा  योजना MSRTC मार्फत राबविली जाते . या प्रवास सवलत योजना अंतर्गत 7 दिवस व 4 दिवस याप्रमाणे बसेच्या प्रकारानुसार तसेच आंतरराज्यांसह प्रवास सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे .

7 दिवसात आवडेल त्या ठिकाण प्रवास करण्यासाठी पासेसचे स्वरुप : सात दिवसांमध्ये आवडेल त्या ठिकाणी प्रवास करण्यासाठी , साधी ( साधी , जलद , रात्रसेवा तसेच शहरी व यशवंती बसेस ) मध्ये आंतरराज्यांसह प्रवास करण्यासाठी प्रौढ व्यक्तींना 2040/- रुपये तर मुलांसाठी 1025/- रुपयांचा पास मिळेल . तर शिवशाही  ( आसनी ) बसेसने आंतरराज्यांसह प्रवास करण्यासाठी प्रौढ व्यक्तींना 3030/- रुपये तर मुलांसाठी 1520/- रुपयांचा पास सुविधा देण्यात येते .

बसेसचा प्रकारप्रौढांसाठीमुले साठी
साधी ( यांमध्ये साधी , जलद , शहरी , यशवंती , रात्रसेवा )2040/- रुपये1170/- रुपये
शिवशाही ( आसनी ) आंतरराज्यांसह3030/- रुपये1520/- रुपये

4 दिवसात आवडेल त्या ठिकाण प्रवास करण्यासाठी पासेसचे स्वरुप : चार दिवसांमध्ये आवडेल त्या ठिकाणी प्रवास करण्यासाठी , साधी ( साधी , जलद , रात्रसेवा तसेच शहरी व यशवंती बसेस ) मध्ये आंतरराज्यांसह प्रवास करण्यासाठी प्रौढ व्यक्तींना 1170/- रुपये तर मुलांसाठी 585/- रुपयांचा पास मिळेल . तर शिवशाही  ( आसनी ) बसेसने आंतरराज्यांसह प्रवास करण्यासाठी प्रौढ व्यक्तींना 1520/- रुपये तर मुलांसाठी 765/- रुपयांचा पास सुविधा देण्यात येते .

बसेसचा प्रकारप्रौढांसाठीमुले साठी
साधी ( यांमध्ये साधी , जलद , शहरी , यशवंती , रात्रसेवा )1170/- रुपये585/- रुपये
शिवशाही ( आसनी ) आंतरराज्यांसह1520/- रुपये765/- रुपये

Leave a Comment