65 वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना “मुख्यमंत्री वयोश्री योजना” अंतर्गत 3,000/- रुपये आर्थिक लाभ ; अर्ज करण्याचे आवाहन !

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ cm vayoshri scheme ] : मुख्यमंत्री वयोश्री योजना अंतर्गत राज्यातील 65 वर्ष व त्यावरील जेष्ठ नागरिकांना तीन हजार रुपये आर्थिक लाभ देण्याची तरतूद सामान्य न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून दिनांक 6 फेब्रुवारी 2024 रोजी च्या शासन निर्णयानुसार करण्यात आलेली आहे याकरिता अर्ज सादर करण्याचे आव्हान प्रशासनाकडून करण्यात आली आहे .

योजनेचे स्वरूप : सदर योजना अंतर्गत राज्यातील वय वर्ष 65 व त्यावरील जेष्ठ नागरिकांना उतार वयामध्ये शारीरिक असमर्थता दुर्बलतेनुसार आवश्यक असणारे साधने उपकरणे खरेदी करण्याकरिता तीन हजार रुपये एक रकमी आर्थिक लाभ देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे सदर पैशातून ज्येष्ठ नागरिकांना श्रवण यंत्र चष्मा फोल्डिंग वॉकर कमोड खुर्ची नि- ब्रेस लंबर बेल्ट इत्यादी साधने खरेदी करणे आवश्यक असणार आहेत.

सदर योजनेसाठी आवश्यक पात्रता : सदर योजना अंतर्गत ज्येष्ठ नागरिक यामध्ये दिनांक 31 डिसेंबर 2023 अखेर पर्यंत वयाची 65 वर्षे पूर्ण असणे आवश्यक असतील , तसेच सदर जेष्ठ नागरिक महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे अनिवार्य असणार आहे तसेच सदर लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे दोन लाख रुपयांच्या आत असणे आवश्यक असेल

सदर योजना साठी आवश्यक असणारी कागदपत्रे

1. मतदान कार्ड आधार कार्ड

2. राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक झेरॉक्स

3.स्वयंघोषणापत्र

4.पासपोर्ट साईज आकाराचे दोन फोटो

अर्ज कसा करावे : सदर योजना अंतर्गत लाभ घेण्याकरिता आपल्या जिल्ह्यातील समाज कल्याण अधिकारी कार्यालय यांच्याशी संपर्क साधून सदर योजना अंतर्गत लाभ घ्यावेत सदर योजना अंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज प्रक्रिया समाज कल्याण अधिकारी कार्यालयामार्फत सुरू आहे तरी प्रशासनाकडून ज्येष्ठ नागरिकांकडून अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे .

Leave a Comment