मराठवाडा व विदर्भातील पशुपालक शेतकऱ्यांना मोठा लाभदायक निर्णय ; मिळणार मोठा फायदा GR दि.16.09.2024

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ marathavada & Vidarbha farmer good nirnay about pashupalan ] : विदर्भ व मराठवाडा विभाग अंतर्गातील तब्बल 19 जिल्ह्यांमध्ये सन 2024-25 ते 2026-27 करीता दुग्ध विकास प्रकल्पाचा टप्पा – 2 राबविणेबात जीआर दि.16.09.2024 रोजी निर्गमित करण्यात आला असून , त्यानुसार प्रकल्पाचे कार्यक्षेत्र , उद्दिष्ट्ये ,तसेच लाभार्थी निवडीचे निकष या बाबी अंतर्भत करण्यात आले आहेत .

सदरच्या निर्णयानुसार सदर विदर्भ व मराठवाडा व विदर्भातील 19 जिल्ह्यांमध्ये दुग्ध विकास प्रकल्प टप्पा – 2 राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे . यांमध्ये प्रामुख्याने उच्च दुग्ध उत्पादन क्षमता असणारी दुधाळ गायी / म्हशींचे शेतकरी , पशुपालक यांना वाटप , उच्च दुग्ध उत्पादन क्षमता असणरी भृणांचे प्रत्यरोपण करण्यात आलेल्या कालवडींचे करण्यात आलेले शेतकरी वाटप , पशु प्रजनन पुरक खाद्याचा पुरवठा , दुधातील फॅट व एसएनएफ वर्धक खाद्य पुरकांचा पुरवठा , बहुवार्षिक चारा पिके घेण्याकरीता अनुदान , मुरघास वाटप , गायी – म्हशींमधील वंध्यत्व निवारण , आधुनिक पद्धतीने दुग्ध व्यवसाय करीता शेतकऱ्यांना प्रशिक्षण या 09 बाबींवर भर देण्यात आली आहे .

या प्रकल्पाच्या प्रमुख उद्दिष्टांमध्ये राज्यात दुधाळ जनावरांची संख्या वाढविणे या आहे , तसेच शेतकरी , पशुपालक यांना संतुलित आहार सल्ला देणे , तसेच वैरण विकास कार्यक्रम व दर्जेदार चारा पुरवठा करुन पशुंच्या आहार पद्धतीत सुधारणा करणे , तसेच उच्च दुध उत्पादन क्षमता असणाऱ्या गायी – म्हशींचे वाटप करणे , रोजगाराची निर्मिती करणे .

लाभार्थीची निवड प्रक्रिया : सदर योजना अंतर्गत लाभार्थीचे निवड करण्याचे निकषांमध्ये शेतकरी तसेच पशुपालकांच्या मालकीची किमान 02 दुधाळ जनावरे असणे आवश्यक असतील . तसेच दुध उत्पादकाने मागील वर्षभरांमध्ये किमान 03 महिने खाजगी अथवा सहकारी यांच्या दुध संकलन केंद्रावर दुध विक्री करणे आवश्यक असेल . तसेच सदर लाभार्थी कुटुबामधील केवळ 01 व्यक्ती निवडीस पात्र ठरेल , तर एका गावांमध्ये कमाल 05 लाभार्थ्यास लाभ घेता येईल .

अनुदान वाटपाची रक्कम : अनुदान वाटपाच्या रक्कमेत प्रति गाय / म्हशींची किंमत ही साधारणपणे 1 लाख रुपये इतकी गृहीत धरण्यात येईल , तर सदर जनावरांचा 03 वर्षांचा विमाचा समावेश . अथवा लाभार्थी यास 50 टक्के हिस्सा अथवा 50,000/- रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल ती रक्कम अनुदान स्वरुप देण्यात येईल . म्हणजेच सदर घटक अंतर्गत लाभार्थ्यांस एकुण 1 लाख रुपये कमाल रक्कम अनुदान स्वरुप दिली जाईल.

तसेच सदर उपक्रम अंतर्गत लाभार्थ्यांस मुरघास करीता अनुदान दिले जाणार आहेत , याकरीता प्रति किलो रुपये 3/- अनुदान देय असणार आहेत , याकरीता एकुण 33,000 लाभार्थीची निवड करण्यात येणार आहे .

तसेच दुधाची पातळी वाढावी याकरीता शेतकऱ्यांना आधुनिक पद्धतीचा दुग्ध व्यवसाय करण्यासाठी प्रशिक्षण दिले जाणार आहेत . सदर योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासनांकडून आयुक्त पशुसंवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली समितीचे गठण करण्यात आले आहेत .

Leave a Comment