@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ cm yuba karya prasikshan yojana additional instraction gr ] : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंमलबजावणीस मान्यता देणेबाबत राज्य शासनांकडून दि.16.09.2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार , अतिरिक्त सुचना देण्यात आलेले आहेत .
राज्यांमधील बेरोजगार तरुणांना त्यांच्या शैक्षणिक अर्हता नुसार त्यांना प्रत्यक्ष प्रशिक्षण देवून त्यांची रोजगार मिळविण्याकरीता क्षमता वाढविण्यासाठी राज्य शासनांच्या दिनांक 09 जुलै 2024 रोजीच्या निर्णयानुसार , मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबविली जात आहे .
सदरच्या योजनांचा प्रचार होवून राज्यातील सर्वाधिक तरुणांना सदर योजना अंतर्गत संधी उपलब्ध होण्याच्या अनुषंगाने दि.09.09.2024 रोजीच्या निर्णयानुसार अतिरिक्त सुचना दिल्या होत्या , सदरच्या निर्णयातील अनु क्रमांक 06 येथील पहिला परिच्छेद वगळण्यात आला असून त्या ऐवजी पुढीलप्रमाणे परिच्छेद समाविष्ट केला गेला आहे .
यांमध्ये नमुद केले गेले आहे कि , उद्योग आधार तसेच उद्यम यांच्याकडे नोंदणीकृत असणाऱ्यां लघु , सुक्ष्म त्याचबरोबर मध्यम स्वरुपातील उप्रक्रमांच्या आस्थापनांना त्यांच्या मनुष्यबळाच्या संख्यानुसार कार्यप्रशिक्षण करीता उमेदवारांची निवड करता येणार आहे .
यांमध्ये उद्योग / उद्यम यांच्याकडे मनुष्यबळाची संख्या ही किमान 10 इतकी आहे , तर अशा उत्पादन / सेवा आस्थापना करीता कार्यप्रशिक्षणाकरीता 01 उमेदवारांची निवड करीता येईल , तर उद्योग / उद्यम यांच्या आस्थापनेवर मनुष्यबळांची संख्या ही 11 ते 20 पर्यंत असल्यास त्यांना सदर कार्यप्रशिक्षण योजना अंतर्गत 02 तरुणांची कार्यप्रशिक्षणांची निवड करता येणार आहे .
म्हणजेच सदर उद्योग / सेवा यांच्या मनुष्यबळांच्या आस्थापनांच्या संख्येच्या 10 ते 20 टक्के उमेदवारांची कार्यप्रशिक्षण करीता तरुणांची रुजु करुन घेण्याचे निर्देश आहेत . तसेच स्टार्ट अप्स क्षेत्रांमधील आस्थापनांना सदर कार्यप्रशिक्षण करीता रुजु करुन देण्याची तरतुद ही कायमस्वरुपी असणार आहे .

- अवेळी पाऊस यामुळे शेतीपिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत निधी जाहीर ; GR दि.19.03.2025
- वाहतुकीचे नियम मोडल्यास असे असतील आत्ताचे सुधारित दंड !
- राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आज दिनांक 19.03.2025 रोजी निर्गमित झाला महत्वपुर्ण शासन निर्णय !
- जुनी पेन्शन , शिक्षण सेवक रद्द करा आदी मागणीसाठी धरणे आंदोलन ; जाणून घ्या सविस्तर वृत्त !
- आगाऊ वेतनवाढी मंजूर करणेबाबत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ; GR दि.17.03.2025