@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी : बळीराजांकडून बऱ्याच दिवसांपासून प्रतिक्षेत असणारा मान्सुन अखेर देशांमध्ये दाखल झाला आहे , तर राज्यांमध्ये हळू – हळू मान्सुन सक्रिय होणार असल्याचा हवामान अंदाज भारतीय हवामान खात्यांकडून देण्यात आलेला आहे .
आज दिनांक 30 मे 2024 रोजी देशातील केरळ राज्यांमध्ये मान्सुनने दमदार एन्ट्री केल्याची माहिती समोर येत आहे , तर सदर नैऋत्य मौसमी वाऱ्यांपासुन पडणारा पाऊसाची हलकी सरी राज्यातील कोकणांमध्ये दिसून आल्या , परंतु राज्यांमध्ये अद्याप मान्सुन सक्रिय झालेला नाही . भारतीय हवामान खात्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार देशातील केरळ व ईशान्य भारतांच्या बऱ्याच भागांमध्ये मान्सुनने आज रोजी एन्ट्री केली आहे .
भारतीय हवामान खात्यांकडून दिलेल्या अंदाजानुसार केरळ मध्ये दिनांक 31 मे रोजी मान्सुन येईल अशी शक्यता होती , परंतु एक दिवस अगोदरच मान्सुनने हजेरी लावली आहे . तर महाराष्ट्रांमध्ये दिनांक 10 जुन पर्यंत मान्सुन येण्याचा अंदाज व्यक्त केला आहे , परंतु काही हवामान तज्ञांनी सांगितले कि महाराष्ट्रात दिनांक 08 जुन रोजी मान्सुनचे आगमन होईल .
तर राज्यांमध्ये पश्चिम महाराष्ट्रात दिनांक 15 जुन 2024 पर्यंत मान्सुन सक्रिय होवून पुढे मराठवाडा व विदर्भामध्ये मान्सुनची एन्ट्री होईल , याकरीता 20 जुन पर्यंतचा अवधी लागुन जाईल असा अंदाज हवामान तज्ञांकडून देण्यात आला आहे .
मान्सुनची दमदार एन्ट्री : केरळमध्ये आज दि.30 मे रोजी मान्सुनने दमदार एन्ट्री केली आहे , यामुळे देशातील बळीराजाला मोठा आनंद झाला आहे . मान्सुनच्या आगमनामुळे सदर भागातील उष्णतेची प्रमाणे कमी होण्यास सहाय्यभूत होत आहेत .
-
सरकारी कर्मचाऱ्यांना 40 दिवसांच्या अतिरिक्त वेतन बोनससह , वाढीव भत्ताचा लाभ !
Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ government employee extra pay bonus and mahagai Bhatta ] : केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना 40 दिवसांचे अतिरिक्त वेतन बोनससह , वाढीव महागाई भत्ताचा लाभ अनुज्ञेय करण्यात आलेला आहे . यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या एकुण सॅलरीमध्ये मोठी वाढ झालेली आहे . सदरचा 40 दिवस बोनस चा लाभ सैन्य दलातील अधिकारी /…