@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Maharashtra State Rain update News ] : भारतीय हवामान खात्यांकडून मिळालेल्या अंदाजानुसार महाराष्ट्र राज्यातील मुंबई , ठाणे , पालघर सह पश्चिम महाराष्ट्रात पुढील चार दिवस मुसळधार पावस पडणार आहे .
नैऋत्य मौसमी वाऱ्यांपासुन दिनांक 08 जुन पासुन राज्यात मान्सून हजेरी लावणार आहे , त्यापुर्वी राज्यांमध्ये अवकाळी पावसाची दाट शक्यता आहे . सध्य स्थितीमध्ये नैऋत्य मौसमी वारे केरळमध्ये पोहोचले असून ,हळू – हळू हे वारे उत्तर दिशेला सरकत आहेत . यामध्ये हे वारे सह्याद्रीच्या पर्वताला अडून कोकणांमध्ये प्रथम मान्सुनची सुरुवात होणार आहे .
तत्वपुर्वी राज्यांमध्ये प्रचंड उष्णतेच्या परिणांमुळे अवकाळी पाऊस पडत आहे , कालपासुन राज्यात मराठवाड्यातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाचे जोरदार हजेरी लावली आहे . अशातच आता राज्यातील मुंबई , पालघर , ठाणे तसेच पश्चिम महाराष्ट्रातील नाशिक , नगर , धुळे , नंदुरबार , जळगाव , पुणे , सातारा , सांगली भागांमध्ये पुढील चार दिवसात मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्यांकडून वर्तविण्यात आलेली आहे .
पुढील चार दिवसांमध्ये राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये किरकोळ प्रमाणात पावस पडेल तर काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण राहील , असा अंदाज भारतीय हवामान खात्यांकडून वर्तविण्यात आलेला आहे .
दरम्यानच्या कालावधीमध्ये वाऱ्याचा वेग हा 40 ते 50 किमी प्रति तास असणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आलेला आहे . वाऱ्याचा वेग प्रचंड असल्याने ,शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे .
-
नविन वेतन आयोगाचे पे – मॅट्रिक्स झाले निश्चित ; जाणून घ्या पगारातील वाढ !

Spread the love@marathiprasar संगिता पवार प्रतिनिधी [ Pay matrix of the new Pay Commission has been finalized. ] : आठवा वेतन आयोगांमध्ये कर्मचारी तसेच पेन्शन धारकांच्या वेतन / पेन्शनमध्ये 20 ते 35 टक्के पर्यंत वाढ होवू शकते . सदर पगार वाढ ही दि.01.01.2026 पासुन सुधारित वेतनसंरचना नुसार लागु करण्यात येणार आहेत . ज्यामध्ये वेतन फरक…
-
राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दि.19.01.2026 रोजी 05 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय (GR) निर्गमित .

Spread the love@marathiprasar संगिता पवार प्रतिनिधी [ 05 major important Government Decisions (GR) issued on 19.01.2026 regarding state employees. ] : राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दि.19.01.2026 रोजी 05 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत . 01.तात्पुरती पदोन्नती व पदस्थापना : महाराष्ट्र शहरी प्रशासकीय सेवेतील मुख्याधिकारी गट ब / सहायक आयुक्त , गट ब संवर्गातुन…
-
राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीच्या वयात वाढ नाहीतर , 02 वर्षांनी कमी करणेबाबत GR निर्गमित दि.17.01.2026

Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ GR issued on 17.01.2026 regarding increase or reduction of retirement age of state employees by 02 years ] : सेवानिवृत्तीचे वय 02 वर्षांनी कमी करणेबाबत राज्य शासनाच्या कृषी व पदुम विभागाकडून दि.17.01.2026 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर शासन निर्णयांमध्ये नमुद करण्यात आले आहे…