राज्यातील आरोग्य सहाय्यक / निरीक्षक कर्मचाऱ्यांचे विविध मागणींसाठी आंदोलन , सविस्तर मागण्या जाणून घ्या सविस्तर !

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Maharashtra state Arogya sahayyak & nirikshak employee strike ] : राज्यातील आरोग्य सहाय्यक / निरीक्षक कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांसाठी आंदोलनाचे आयोजन करण्यात आलेले आहेत . सदर कर्मचाऱ्यांचे नेमके कोण-कोणत्या मागण्या आहेत , ते खालीलप्रमाणे जाणून घेवूयात ..  

  • राज्यातील आरोग्य सहाय्यक व निरीक्षक या पदांची वेतनत्रुटी दुर करुन एस – 13 अशी सुधारित वेतनश्रेणी देण्यात यावी .
  • जिल्हा परिषद आरोग्य सहाय्यक यांना राज्यस्तरीय आरोग्य निरीक्ष याप्रमाणे आरोग्य निरीक्षक असा पदनामात बदल करण्यात यावा .
  • आरोग्य निरीक्षक / निरीक्षक यांना कायम प्रवास भत्ता किमान रुपये 5000/- रुपये करण्यात यावा .
  • आरोग्य सहाय्यक / निरीक्षक यांना रुपये 15000/- ईन्सेटीव ( कामावर आधारीत मोबदला ) देण्यात यावा .
  • अतिदुर्गम आदिवासी भागांमध्ये कार्यरत आरोग्य सहाय्यक / निरीक्षक यांना इतर आरोग्य कर्मचारी प्रमाणे हार्डशीप भत्ता देण्यात यावा .
  • राज्यस्तरीय आरोग्य निरीक्षक यांना बदली संदर्भात 53 वर्षांची सुट मिळावी .
  • आरोग्य सहाय्यक / निरीक्षक यांना तसेच इतर आरोग्य कर्मचारी यांना विशेष जोखीम भत्ता देण्यात यावा .
  • आरोग्य पर्यवेक्षक पदी पदोन्नती देताना प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी या कॅडरमधून न देता फक्त आरोग्य सहाय्यक / निरीक्षक या कॅडरमधूनच देण्याची मागणी करण्यात आली आहे .
  • तसेच प्रत्येक जिल्हास्तरावर आरोग्य भवनची निर्मिती करण्यात यावी अशा मागण्यांसाठी दिनांक 12 जुलै 2024 रोजी मंत्रालय आझाद मैदान मुंबई येथे एकदिवसीय लक्षवेध धरणे आंदोलन आयोजित करण्यात आलेले आहेत .

या संदर्भातील महाराष्ट्र राज्य आरोग्य सहाय्यक / निरीक्षक कर्मचारी संघटनेच्या वतीने दिनांक 01.07.2024 रोजी निर्गमित करण्यात आलेले प्रसिद्ध पत्रक डाउनलोड करण्यासाठी Click Here

Leave a Comment