@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ maharashtra new cm update ] : विधानसभा निकाल लागून आज सात दिवस झाले तरीही राज्याचे नवीन मंत्रिमंडळ स्थापन झाले नाहीत . याचे प्रमुख कारण म्हणजे राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण होईल ? यासाठी संघर्ष सुरू आहे .
महायुती पक्षाचे तिन्ही नेत्यांची अमित शहा यांच्यासोबत बैठक संपन्न होऊन देखील , राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण होईल हे अद्याप स्पष्ट झाले नाही . राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच व्हावेत असा जनमत दिसून येत असल्याने , लोकांच्या भावना लक्षात घेऊन , राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच पुढील 01 वर्षाकरिता करावे ,असे भाजप मधील काही ज्येष्ठ नेत्यांचे मत आहे .
तर दुसरीकडे एकनाथ शिंदे नाराज होऊन साताऱ्यातील आपल्या मूळ गावी मुक्कामी आहेत . यावरून एकनाथ शिंदे नाराज असल्याचे , दिसून येत आहेत . सत्ता स्थापन करीता एकनाथ शिंदे यांची अनुपस्थितीमुळे राज्यात सरकार स्थापन होण्यास विलंब होत आहे .
एकनाथ शिंदे हे मंत्रीपदावरून नाराज असल्याचे स्पष्ट झाले आहे , यामध्ये जर मुख्यमंत्रीपद मिळाल्यास शिंदे गटाला कमी मंत्रीपद दिले जाण्याची शक्यता आहे , तर महत्वाचे खाते अजित पवार गटाला व भारतीय जनता पार्टीकडे राहतील , यामुळे एकनाथ शिंदे यांच्यामध्ये नाराजगी दिसून येत आहे .
त्याचबरोबर पक्षांच्या संख्याबळानुसार मंत्रिपद दिल्यास , भारतीय जनता पार्टीला सर्वाधिक मंत्रीपद मिळतील . व महत्त्वाची खाते भारतीय जनता पार्टी तसेच अजित पवार गटाला दिले जाण्याची शक्यता असल्याने , एकनाथ शिंदे यांच्यामध्ये नाराजगी कायम असल्याचे दिसून येत आहेत .
कारण मागील सत्तेमध्ये देखील शिंदे गटाला कमी मंत्रिपदे तसेच महत्त्वाची खाते नसल्याने , शिंदे गटांमध्ये नाराजगी होती . तर यंदा शिंदे गटाला महत्त्वाची खाती मिळावीत तसेच मुख्यमंत्री पद देण्यात यावे अशी शिंदे गटाची आहे .
- नविन वेतन आयोगाचे पे – मॅट्रिक्स झाले निश्चित ; जाणून घ्या पगारातील वाढ !
- राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दि.19.01.2026 रोजी 05 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय (GR) निर्गमित .
- राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीच्या वयात वाढ नाहीतर , 02 वर्षांनी कमी करणेबाबत GR निर्गमित दि.17.01.2026
- राज्य कर्मचाऱ्यांच्या रजा नियमांमध्ये सुधारणा ; वित्त विभाग शासन अधिसूचना दि.28.01.2025
- राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.31 डिसेंबर रोजी निर्गमित करण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय !