@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ old pension scheme] : वित्त विभागाच्या शासन निर्णय दिनांक 02 फेब्रुवारी 2024 नुसार , दिनांक 01 नोव्हेंबर 2005 पूर्वीच्या पदभरतीची जाहिरात त्याचबरोबर अधिसूचनेनुसार दिनांक 01 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर अपर आयुक्त कार्यालय नाशिक , ठाणे व अमरावती अंतर्गत नियुक्त .
सर्व स्थापनेवरील सर्व पात्र वर्ग तीन व वर्ग चार संवर्गातील कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी पेन्शन योजना (old pension) लागू करून पुढील योग्य ती कार्यवाही होणेबाबत , आयुक्त आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र राज्य नाशिक यांच्यामार्फत दिनांक 28 नोव्हेंबर 2024 रोजी परिपत्रक सादर करण्यात आली आहे .
सदरच्या परिपत्रका नुसार नमूद करण्यात आले आहे की , राज्य शासनाच्या दृष्टिकोनाकडून दिनांक 02 फेब्रुवारी 2024 नुसार दिनांक 01 नोव्हेंबर 2005 पूर्वीची पदभरतीची जाहिरात तसेच अधिसूचनेनुसार दिनांक 01 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर अप्पर आयुक्त कार्यालय नाशिक , ठाणे व अमरावती अंतर्गत नियुक्त सर्व स्थापनेवरील ..
सर्व पात्र वर्ग 03 व वर्ग 04 संवर्गातील कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी पेन्शन योजना (OLD PENSION ) लागू करून त्यास अनुलक्षून योग्य ती कार्यवाही होणेबाबत विनंती केली आहे .
या संदर्भात शासन निर्देशानुसार नियमोचित कार्यवाही यापूर्वीच होणे क्रमप्राप्त होते , याबाबत अपर आयुक्त कार्यालय नागपूर , व्यतिरिक्त कार्यवाही झाली नसल्याचे निर्देशनास येते , याद्वारे सूचित करण्यात आले आहे की , जुनी पेन्शन योजना संदर्भातील कार्यवाही तातडीने करण्यात यावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करण्याची निर्देश देण्यात आली आहेत .
