@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी : आज दिनांक 19 एप्रिल 2024 रोजी पहिल्या टप्यातील मतदान प्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली आहे . यांमध्ये मतदान प्रक्रिया कामकाजातील नियुक्ती अधिकारी / कर्मचाऱ्यांचे मोलाचा वाटा आहे . तसेच नक्षलग्रस्त भागांमध्ये मतदान प्रक्रिया शांततेने होण्याकरीता गृह विभागांकडून मोठी शर्तीचे काम केले आहेत .
वाढत्या तापमानामुळे मतदानाची टक्केवारी घसरली : सध्या विदर्भाचे तापमान पाहिले तर , 40 अंश सेल्सिअस पेक्षा अधिक तापमान आहे . यामुळे मतदान प्रक्रियावर याचा विपरीत परीणाम दिसून आला आहे . वाढत्या तापमानामुळे सकाळी व सायंकाळीच्या वेळीच मतदारांची मतदान केंद्रावर गर्दी दिसून आली .
राज्यात आज दिनांक 19 एप्रिल 2024 रोजी पहिल्या टप्यात रामटेक , नागपुर , भंडारा – गोंदिया , गडचिरोली-चिमुर व चंद्रपुर या 5 लोकसभा मतदारसंघाकरीता मतदान झाले . यांमध्ये मतदानाची टक्केवारी जर पाहिली तर गडचिरोली – चिमुर मतदार संघामध्ये सर्वाधिक मतदान 64.95 टक्के इतके झाले . तर सर्वात कमी मतदान हे नागपुर मतदार संघामध्ये झाले . मतदान संघानिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे पाहु शकता ..
अ.क्र | मतदार संघाचे नाव | मतदानाची टक्केवारी |
01. | गडचिरोली – चिमुर | 64.95% |
02. | भंडारा – गोंदिया | 56.87% |
03. | चंद्रपुर | 55.11% |
04. | रामटैक | 52.38% |
05. | नागपुर | 47.91% |
तर पहिल्या टप्यातील देशातील इतर राज्यातील मतदानाची टक्केवारी पाहिली असता , त्रिपुरामध्ये 68.35 टक्के मतदान झाले आहे , जे कि इतर राज्यांमध्ये सर्वाधिक आहे .
मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी करावी लागेल उपाययोजना : बरेच जन कामानिमित्त इतर राज्यांमध्ये वास्तव्यास असल्याने , असे मतदार मत करु शकत नाही , याकरीता काही विशेष मोहिम हाती घेणे आवश्यक आहे . जसे कि , भारतीय सेना मधील मतदारांना ऑनलाईन पद्धतीने मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली जाते . त्याप्रमाणे सुविधा उपलब्ध करुन दिल्यास , नक्कीच मतदानाची टक्केवारी वाढेल .