लाडकी बहीण योजनेबाबत मंत्रिमंडळ बैठकीमधील महत्त्वपूर्ण निर्णय ; जाणून घ्या सविस्तर !

Spread the love

@marathiprasar [ ladaki bahin yojana cabinet nirnay ] : सध्या राज्यात लाडकी बहीण योजना मोठ्या प्रमाणात लाभदायक ठरत आहे परंतु या योजनेबाबत अनेक अपवाद देखील पसरत असल्याची माहिती राज्य शासनाच्या निदर्शनास आले असल्याने राज्य शासनाकडून काल दिनांक 5 सप्टेंबर 2024 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण निर्देश देण्यात आलेली आहेत .

काल दिनांक 5 सप्टेंबर 2024 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये , लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्यास ,अन्य प्रकारचे योजनांचा लाभ मिळणार नाही .अशा प्रकारचे वृत्त सध्या पसरत आहेत . परंतु हे वृत्त चुकीचे असल्याचे स्पष्टीकरण सदर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये देण्यात आलेली आहेत . यामध्ये स्पष्ट केले आहे की , शेतकरी कुटुंबातील लाडकी बहीण योजनेची लाभार्थी असणाऱ्यांना अन्य प्रकारच्या शेतीविषयक योजना बंद होणार नसल्याचे स्पष्ट नमूद केली आहेत .

त्याचबरोबर सदर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये लाडकी बहीण योजने अंतर्गत दुसऱ्या टप्प्यातील तब्बल एक कोटी 59 लाख महिलांच्या बँक खात्यामध्ये , तब्बल 4,787 कोटी रुपये महाडीबीटी मार्फत थेट बँक खात्यात हस्तांतरित करण्यात आले आहेत . यामध्ये माहे जुलै आणि ऑगस्ट अशी एकत्रित तीन हजार रुपये लाडकी बहीण योजने अंतर्गत जमा करण्यात आली आहेत .

यामुळे सदर दुसऱ्या टप्प्यातील वाटपामुळे आतापर्यंत राज्यातील तब्बल अडीच कोटी महिलांच्या बँक खात्यामध्ये सदर योजने अंतर्गत पैसे पाठवण्यात आलेले आहेत . तर अर्ज करण्याची सुविधा दिनांक 30 सप्टेंबर पर्यंत वाढवण्यात आलेली आहे . यामुळे अद्याप अर्ज न केलेल्या महिलांना अर्ज करण्यासाठी सवलत देण्यात आली आहे , त्याचबरोबर सदर योजने , अंतर्गत गैरप्रकार केलेल्या / चुकीचे कागदपत्रे सादर करून आवेदन केलेल्या व्यक्तींवर गुन्हा दाखल करून अटक करण्याचे निर्देश देखील देण्यात आलेले आहे .

Leave a Comment