@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ soyabean rate increase news ] : सोयाबीनच्या बाजार भावामध्ये अचानक मोठी वाढ झाल्याने , सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत असल्याचे , दिसून येत आहे . मागील महिन्यामध्ये सोयाबीनला 4,000/- पेक्षा कमी भाव मिळत होता . यामुळे शेतकरी मोठ्या चिंतेत होते , परंतु अचानक सोयाबीनच्या बाजारभाव मध्ये मोठी वाढ झाल्याने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळालेला आहे .
दिनांक 06 सप्टेंबर रोजी सोयाबीनला अकोला बाजार समितीमध्ये 4600/- प्रतिक्विंटल इतका बाजार भाव मिळाला , त्याचबरोबर सदर बाजार समितीमध्ये किमान 4,100/- रुपये तर कमाल 4745/- रुपये इतका बाजार भाव मिळाला . यामुळे ऐन गणेशोत्सवाच्या कालावधीमध्ये , शेतकऱ्यांना गणपती पावलाच असे समजायला हरकत नसल्याचे म्हटले जात आहेत .
तर आज दिनांक 7 सप्टेंबर 2024 रोजी लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला कमाल बाजारभाव 4650/- रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला आहे , तर राज्यामध्ये सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सर्वाधिक 4950/- रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळाला आहे .
सर्वसाधारणपणे राज्यात सोयाबीनचा बाजारभाव पाहिला असता 4300/- पेक्षा अधिक आहे . जे की मागील महिन्यामध्ये चार हजार रुपये पेक्षा कमी होते . सोयाबीनला बाजार भाव वाढल्याने , बाजार समितीमध्ये सोयाबीनचे आवक वाढली असून , शेतकऱ्यांना दिलासा प्राप्त झालेला आहे .
सोयाबीनचा बाजारभाव प्रतिक्विंटल 5000/- रूपये पेक्षा अधिक होण्याचा अंदाज : सध्या केंद्र सरकारकडून सोयाबीनला बाजार भाव मिळावा , याकरिता सोयाबीनची आयात करणे थांबवले असल्याने , त्याचबरोबर विदेशामध्ये अतिपावसाने सोयाबीन उत्पादनावर विपरीत परिणाम झाल्याने , आंतरराष्ट्रीय बाजारपेठत देखील सोयाबीनचे बाजार भाव वाढले आहेत . यामुळे पुढील महिन्यापर्यंत सोयाबीनला कमाल 5500/- इतका बाजार भाव मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे .
याशिवाय यावर्षी राज्यात सर्वाधिक सोयाबीन होणारे मराठवाडा, विदर्भामध्ये अतिवृष्टी झाल्याने , सोयाबीन उत्पादनावर विपरीत परिणाम झालेले आहेत . त्याचबरोबर देशामध्ये सर्वाधिक सोयाबीनचे उत्पादन घेतले जाणारे मध्यप्रदेश मध्ये देखील यावर्षी अतिवृष्टी झाल्याने सोयाबीन उत्पादनावर विपरीत परिणाम दिसून आले आहेत. यामुळेच यंदा सोयाबीनला चांगला बाजारभाव मिळण्याची शक्यता तज्ञाकडून वर्तवली जात आहे .
- राज्य कर्मचारी / अधिकारी संदर्भात दि.13 जुन रोजी निर्गमित करण्यात आले 02 महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR )
- महाराष्ट्र पेन्शनर्स : पेन्शन धारकांसाठी आत्ताची मोठी अपडेट ; पेन्शनर्स असोसिएशन , पुणे मार्फत प्रसिद्धपत्रक निर्गमित !
- दि.10 जुन 2025 रोजी झालेल्या राज्य मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण कॅबिनेट निर्णय !
- निवृत्त कर्मचाऱ्यांच्या सेवा करार पद्धतीने घेणे व जुनी पेन्शन बाबत 02 स्वतंत्र शासन निर्णय निर्गमित दि.10.06.2025
- राज्य कर्मचारी संदर्भात दिनांक 10 जुन रोजी घेण्यात आले 03 महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR ) !