@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ kotal junior scholarship yojana ] : इयत्ता 10 वी मध्ये 85 टक्के गुणांसह उत्तीर्ण उमेदवारांना इयत्ता 11 वी व 12 वीच्या पुढील शिक्षणांसाठी 73,500/- रुपये इतकी रक्कम शिष्यवृत्ती स्वरुपात देण्यात येते , सदरची शिष्यवृत्ती ही कोटक एज्युकेशन फाऊंडेशन मार्फत दिली जाते .
या शिष्यवृत्ती योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक पात्रता : सदर शिष्यवृत्ती कार्यक्रम अंतर्गत लाभ मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांस इ.10 वी 85 टक्के पेक्षा अधिक गुण प्राप्त होणे आवश्यक असेल , तर त्या विद्यार्थ्यांने सन 2024-25 या शैक्षणिक वर्षांमध्ये मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन मध्ये कला , विज्ञान अथवा वाणिज्य शाखेत इ.11 वी साठी प्रवेश मिळवला असणे आवश्यक आहे .
त्याचबरोबर सदर विद्यार्थ्याचे / कौटंबिक मागलि वर्षाचे वार्षिक उत्पन्न हे 320,000/- पेक्षा कमी असणे आवश्यक असेल .तसेच सदर विद्यार्थी हा 11 वी व 12 वी च्या शिक्षणासाठी मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन मध्ये वास्तव्यास असणे आवश्यक असेल .
आर्थिक लाभ कसे मिळेल ? सदर शिष्यवृत्ती योजना अंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना इ.11 वी व 12 वी दरम्यान दरमहा 3,500/- रुपये इतकी तर एकुण 21 महिन्यांकरीता 73,500/- रुपये इतकी शिष्यवृत्ती रक्कम दिली जाते .
आवश्यक असणारी कागदपत्रे : सदर शिष्यवृत्तीचे आवेदन सादर करण्यासाठी मार्कशीट ( दहावी ) , पासपोर्ट फोटो , शाळा सोडल्याचा दाखला , बँक खाते , आधारकार्ड इ.
अर्ज कसा कराल ? सदर शिष्यवृत्ती लाभ घेण्याकरीता https://www.buddy4study.com/ या संकेतस्थळावर kotak junior scholarship 2024-25 या शिष्यवृत्तीला क्लिक करुन ऑनलाईन पद्धतीने दिनांक 30 जुन 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
-
अवेळी पाऊस यामुळे शेतीपिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत निधी जाहीर ; GR दि.19.03.2025
Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Relief fund for those affected by crop damage due to unseasonal rains ] : नोव्हेंबर 2024 ते माहे डिसेंबर 2024 या कालावधीमध्ये विविध जिल्ह्यात अवेळी पाऊस यामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानी पोटी बाधितांना मदत देणेबाबत , महसूल व वन विभाग मार्फत दिनांक 19 मार्च 2025 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय…
-
वाहतुकीचे नियम मोडल्यास असे असतील आत्ताचे सुधारित दंड !
Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ These are the current revised rates for breaking traffic rules ] : वाहतुकीचे नियम मोडलयास सुधारित दंडाची रक्कम सरकारकडून निश्चित करण्यात आलेली असून , यांमध्ये तब्बल 1000 पटीने रक्कम वाढविण्यात आलेली आहे . दारु पिऊन गाडी चालविणे : दारु पिऊन गाडी चालविल्यास जुन्या दरानुसार 1000-1500/- रुपये दंड आकारला…
-
राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आज दिनांक 19.03.2025 रोजी निर्गमित झाला महत्वपुर्ण शासन निर्णय !
Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ An important government decision was issued today, 19.03.2025, regarding state employees. ] : राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आज दिनांक 19 मार्च 2025 रोजी सामान्य प्रशासन विभागांकडून महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर शासन निर्णयानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , शासकीय अधिकारी / कर्मचारी यांचे गोपनीय…