@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Koradvahu sheti vikas yojana ] : राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत कोरडवाहू क्षेत्र विका योजना राबविण्यात येते , जेणेकरुन कोरडवाहू शेतकऱ्यांना दिलासा मिळतो , या योजना मधून शेतकऱ्यांचे मनोबल वाढावे , याकरीता विविध शेती विकास उपायांवर आर्थिक सहाय्य केले जाते ..
या योजनेचे मुख्य उद्देश : या योजनेचे मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांच्या उत्पादन क्षेमतेमध्ये शाश्वत वाढ करणे त्यांना नविन उपजिविकेच्या साधानांची उपलब्धता करुन देणे , ज्यामुळे कोरडवाहु क्षेत्रातील शेतकऱ्यांचे जिवनमान उंचावण्यास मदत होईल . तसेच कोरडवाहु शेतीबाबत शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढण्यास सहकार्य होईल ..
या योजना अंतर्गत लाभ घेण्यासाठी आवश्यक पात्रता : या योजनांच्या माध्यमातुन लाभ घेण्यासाठी महिला शेतकरी / अत्यल्प / अल्प भुधारक शेतकऱ्यांना या योजना अंतर्गत प्रथम प्राधान्य दिले जाते ..यांना एकुण निधीच्या 50 टक्के रक्कम खर्च केले जाते , तर अनुसुचित जाती प्रवर्ग साठी 16 टक्के तर अनुसुचित जमाती प्रवर्ग साठी 8 टक्के निधी खर्च करण्यात येते .
तसेच शेतकरी हा पारंपारिक शेती पद्धतीमध्ये बदल करुन , एकात्मिक शेती पद्धतीने शेती करण्यास इच्छूक असणे आवश्यक असेल . सदरची योजना ही समुह आधारित आहे , यामुळे इच्छुक शेतकऱ्यांनी आपल्या गावातील कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधुन या योजना अंतर्गत लाभ घेण्यासाठी आवेदन सादर करु शकता .
अनुदान कसे मिळते : यांमध्ये फळपीक आधारित शेती करीता 25000/- रुपये प्रति हेक्टर , तर 7 दग्धोत्पादक पशुधन आधारित शेती करीता प्रति हेक्टरी 40,000/- रुपये , तर इतर पशुधन आधारित शेती पद्धती करीता प्रति हेक्टरी 25,000/- रुपये , तर वनिकी आधारित शेती पद्धती करीता 15,000/- रुपये प्रति हेक्टरी ..
तसेच ग्रीन हाऊस 468/- रुपये प्रति चौ.मी , तर शेडनेट हाऊस रुपये 355/- रुपये प्रति चौ.मी , मुरघास युनिट करीता 125,000/- रुपये प्रति युनिट , मधुमक्षिका पालन 800/- रुपये प्रति कॉलनी , काढणी पश्चात तंत्रज्ञान 4000/- प्रति चौ.मी , गांडुळ खत करीता 50,000/- प्रति युनिट अशा प्रकारचे अनुदानाचे स्वरुप असेल .
अर्ज कोठे कराल ? आपणांस या योजना अंतर्गत आणखीण अधिक माहिती व अर्ज सादर करण्यासाठी आपल्या तालुका कृषी अधिकारी कार्यालया / जिल्हा अधिक्षक कृषी अधिकार कार्यालय यांच्याशी भेट द्यावी ..
-
नविन वेतन आयोगाचे पे – मॅट्रिक्स झाले निश्चित ; जाणून घ्या पगारातील वाढ !

Spread the love@marathiprasar संगिता पवार प्रतिनिधी [ Pay matrix of the new Pay Commission has been finalized. ] : आठवा वेतन आयोगांमध्ये कर्मचारी तसेच पेन्शन धारकांच्या वेतन / पेन्शनमध्ये 20 ते 35 टक्के पर्यंत वाढ होवू शकते . सदर पगार वाढ ही दि.01.01.2026 पासुन सुधारित वेतनसंरचना नुसार लागु करण्यात येणार आहेत . ज्यामध्ये वेतन फरक…
-
राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दि.19.01.2026 रोजी 05 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय (GR) निर्गमित .

Spread the love@marathiprasar संगिता पवार प्रतिनिधी [ 05 major important Government Decisions (GR) issued on 19.01.2026 regarding state employees. ] : राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दि.19.01.2026 रोजी 05 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत . 01.तात्पुरती पदोन्नती व पदस्थापना : महाराष्ट्र शहरी प्रशासकीय सेवेतील मुख्याधिकारी गट ब / सहायक आयुक्त , गट ब संवर्गातुन…
-
राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीच्या वयात वाढ नाहीतर , 02 वर्षांनी कमी करणेबाबत GR निर्गमित दि.17.01.2026

Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ GR issued on 17.01.2026 regarding increase or reduction of retirement age of state employees by 02 years ] : सेवानिवृत्तीचे वय 02 वर्षांनी कमी करणेबाबत राज्य शासनाच्या कृषी व पदुम विभागाकडून दि.17.01.2026 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर शासन निर्णयांमध्ये नमुद करण्यात आले आहे…