@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Job in Other Country info ] : आपण जर रोजगाराच्या शोधात असाल तर आपण विदेशांमध्ये जावून चांगल्या प्रकारचा पैसा कमवून भारतामध्ये पाठवू शकता . ज्या देशांचे पैश्यांचे मुल्य हे भारतीय रुपयांपेक्षा अधिक असेल अशा देशांमध्ये काम करुन तो पैसा भारतांमध्ये वापरल्यास , निश्चित चांगला फायदा मिळतो .
जगाच्या पाठीवर भारतीय सर्व ठिकाणी कामानिमित्त गेले आहेत , तेथे काम करुन पैसा भारतांमध्ये पाठवतात , यामुळे भारतीय गंगाजळीमध्ये विदेशी चलन मिळण्यास सहाय्यभूत ठरते . आपल्या देशातील नागरिक जास्त करुन अरब अमिराती ( युएई ) या देशांमध्ये खास करुन दुबई शहरांमध्ये कामानिमित्त जात असतात . या देशातील कायदे / कानुन कडक असल्याने , भारतीय दुबई मध्ये कामानिमित्त जाण्यास कुचराई करत होते .
परंतु आजच्या काळांमध्ये दुबई मध्ये भारतीय नागरिक कामानिमित्त सर्वाधिक आहेत . यांमध्ये वाहनचालक , फिटर , प्लंबर , वेटर , घरकाम अशा प्रकारचे अनेक कामे करण्यासाठी भारतीय कामगार तेथे जातात . युएईचे 1 दिऱ्हम म्हणजेच 22.72 भारतीय रुपया असे मुल्य आहे , यामुळे या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांना मोठा फायदा होतो . कारण भारतीय कामगार तेथे काम करतात व पैसा भारतामध्ये पाठवतात .
दुबई मध्ये भारतीय कामगारांना सर्वसाधारण पणे 1800/- दिऱ्हम ते 2200/- दिऱ्हम इतका पगार मिळतो , म्हणजेच भारतीय रुपयाचे मुल्य 40,896/- ते 45,440/- रुपये इतका होते . म्हणजेच दुबई मध्ये सर्वसाधारण कामगारांना देखिल चांगला पगार मिळतो . यामुळे हे देश भारतीयांना आर्थिक दुष्ट्या फायदेशिर तर आहेत , तसेच सुरक्षितेच्या दृष्टीने देखिल चांगला देश आहे . या देशांमध्ये भारतीय नागरिक मोठ्या प्रमाणात असल्याने , भारतीय विदेशी मंत्रालय या ठिकाणी उत्तमरित्या काम करते .
यानंतर कॅनडा या देशांमध्ये आपल्या देशातील शिख समुदायांचे लोक मोठ्या प्रमाणात राहतात . कॅनडा देशामध्ये एकुण लोकसंख्येच्या 2.12 टक्के लोक हे शिख आहेत , या ठिकाणी शिख लोकांना चांगले मान सन्मान आहे . यामुळे हे देश शिख समुदायी लोकांनी रोजगारासाठी उत्तम देश आहे . 1 कॅनडीयन डॉलरची किंमत ही 61.13 भारतीय रुपये इतके मुल्य आहे , यामुळे या देशांमध्ये काम करणाऱ्या भारतीयांना अधिक लाभदायक ठरणार आहे .
अमेरिकांमध्ये जास्त करुन सॉफ्टेअर इंजिनिअर , शास्त्रज्ञ अशा तज्ञ व्यक्तींसाठी कायम खुले आहे , परंतु एकदा आपल्या देशातील तज्ञ नागरिक या देशांमध्ये कामानिमित्त गेल्यास तो तेथेच स्थायीक होवून जातो . या देशांमध्ये अनेक सॉफ्टवेअर कंपन्या आहेत . यामुळे तज्ञांसाठी रोजगाराचे चांगले स्कोप या देशांमध्ये आहे .
याशिवाय सिंगापुर , श्रीलंका , रशिया , कुवेत , ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये भारतीय नागरिक कामानिमित्त जात असतात . जे कि भारतीय कामगारांना सुरक्षित आहेत .
-
राज्य कर्मचाऱ्यांना देय व अनुज्ञेय रजेची वैशिष्ट्ये – अर्जित रजा ( नियम 50 ) ; जाणून घ्या सविस्तर !

leave rules
-
सरकारी कर्मचाऱ्यांना 7 वा वेतन आयोगातील शेवटचे तीन महागाई भत्ता वाढ ; जाणून घ्या सविस्तर !

Spread the loveMarathiprasar प्रज्ञा पवार प्रतिनिधी [ Government employees to get last three dearness allowance hikes in 7th Pay Commission ] : दर दहा वर्षांनी नविन वेतन लागु करण्यात येत असतो , जसे कि सन 2016 पासुन सध्या सातवा वेतन आयोग लागु आहे . सदर सातवा वेतन आयोगाची मुदत ही दि.31.12.2025 रोजी संपणार आहे .…
-
मोदी सरकार मार्फत सरकारी कर्मचारी / पेन्शन धारकांना दोन मोठे गिफ्ट ; जाणुन घ्या सविस्तर ..

Spread the loveMarathiprasar संगिता पवार प्रतिनिधी [ Two big gifts for government employees/pensioners through Modi government ] : केंद्र सरकार मार्फत सरकारी कर्मचारी तसेच पेन्शन धारकांसाठी दोन मोठे गिफ्ट मिळणार आहे . 01.नविन वेतन आयोग : केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना नविन वेतन आयोग लागु करणेबाबत समितीचे गठण करण्यात आलेले असून , पुढील 18 महिन्यांत आपला…