@marathipepar खुशी पवार प्रतिनिधी [ maharashtra Student employeement in Germany] : राज्यातील होतकरू तसेच हुशार विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याकरिता राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडून जर्मनी देशांमध्ये नोकरी करिता मुंबई येथे 15 केंद्रावर प्रशिक्षण देण्याचे कामकाज सुरू आहेत. यावेळी मुंबई प्रादेशिक विद्या प्राधिकरणाचे प्राचार्य श्रीमती मनीषा पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आहे .
जर्मनी व महाराष्ट्र राज्य शासनाकडून एक जर्मनीतील बाडेन वुटेनबर्ग करार झाला आहे , सदर करारानुसार महाराष्ट्र राज्यातील तब्बल दहा हजार कुशल मनुष्यबळ जर्मनी देशांमध्ये पुरवण्यात येणार असून , विविध क्षेत्रांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिले जाणार आहेत . याकरिता जर्मनी देशांमध्ये रोजगाराच्या संधी करिता इच्छुक असणाऱ्यांनी ऑनलाईन पद्धतीने https://www.maa.ac.in/ या लिंकवर नोंदणी करायची आहे .
जर्मन देशांमध्ये नोकरी करिता जर्मन भाषेची ज्ञान असणे आवश्यक असणार आहे, याकरिता मुंबईमध्ये तब्बल 15 केंद्रावर जर्मन भाषा प्रशिक्षण दिले जाणार आहेत . या 15 केंद्राची नावे पुढील प्रमाणे आहेत : यामध्ये पार्ले टिळक विद्यालय विलेपार्ले पूर्व , विसावा विद्यामंदिर अंधेरी पूर्व शेठ चुनीलाल दामोदरदास , बर्फीवाला हायस्कूल अंधेरी पश्चिम, सेंट कोलांबा स्कूल ग्रँड रोड, डी एस हायस्कूल सायन पश्चिम वालीराम बिहरू मल मेलवानी मॉडेल हायस्कूल ग्रँड रोड पश्चिम , अहिल्या विद्यामंदिर काळाचौक
एस.एस.एम. एम. सी.एम गर्ल्स हायस्कूल काळाचौकी, ओ एल पी एस हायस्कूल चेंबूर वाणी, विद्यालय हायस्कूल मुलुंड पश्चिम पंत वालावलकर माध्यमिक विद्यालय कोल्हापूर , शेठ धनोजी देवशी राष्ट्रीय शाळा , घाटकोपर पूर्व आणि संदेश विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय विक्रोळी पूर्व , श्रीराम वेल्थकेअर सोसायटी हायस्कूल अंधेरी पश्चिम , आई एस न्यू इंग्लिश स्कूल वांद्रीपूर्व अशा एकूण 15 केंद्रावर जर्मन भाषा प्रशिक्षण देणे सुरू आहे .
यामुळे राज्यातील पात्र व इच्छुक उमेदवारांनी वरील लिंक वर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायची आहेत , सदर उमेदवारांना जर्मन भाषेचे प्रशिक्षण देऊन जर्मनी देशांमध्ये रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे ही राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगाराची उत्तम संधी असणार आहे .
- 01 जुलै पासुन 04 जुलै पर्यंत राज्यात पावसाची दमदार सुरुवात ; IMD कडून या जिल्ह्यांना तुफान पावसाची शक्यता !
- राज्य कर्मचाऱ्यांना “ही” योजना लागु करणेबाबत ; वित्त विभागांकडून GR निर्गमित दि.30.06.2025
- लहानपणांपासुनच इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे बालपण तर हरवतच आहे ; तसेच मुलांच्या बुद्धांक वाढीवर देखिल होतोय विपरित परिणाम !
- नविन वेतन आयोग किमान फिटमेंट फॅक्टर राज्य कर्मचाऱ्यांचे किमान वेतन Pay Scale नुसार जाणून घ्या , संभाव्य वेतनश्रेणी !
- राज्यातील पेन्शनधारकांसाठी सा. प्र. विभागाचा अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय ( GR) ; जाणून घ्या सविस्तर !