@ marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी : सध्या मार्केटमध्ये अनेक पेमेंट ॲप्स लॉन्च होत आहेत , या रेसमध्ये फ्लिपकार्ट पे , टाटा पे यानंतर आता जियो पे ने धमाकेदार एन्ट्री केली आहे . यामुळे सध्या सक्रिय असणाऱ्या पेटीएम ,फोन पे , गुगल पे यांचे टेन्शन अधिकच वाढले आहे . जिओनी भारतीय दूरसंचार प्रणालीमध्ये कमी कालावधीमध्ये सर्वाधिक ग्राहक मिळवले आहेत , बाजारामध्ये जिओचे दूरसंचार आल्यानंतर इतर कंपनीचे ग्राहक मोठ्या प्रमाणात कमी झाले आहेत.
जिओनी स्वतःचे जिओ फायनान्स सर्विस सुरू केली आहे , जे की बजाज फायनान्स , टाटा फायनान्स यांना टक्कर देत आहे . कमी कालावधीमध्ये जियो फायनान्सने मोठे यश संपादन केले आहे . जिओ पे ॲप्स बाजारामध्ये यापूर्वीपासूनच कार्यरत आहे , परंतु यूपीआय प्रणालीमध्ये नवनवीन कल्पना व पेमेंट करिता सुविधा याकरीता नवीन जिओ साउंड बॉक्स विकसित करण्यात येत आहेत . या ॲपची यशस्वीरित्या चाचणी देखील करण्यात आली आहे .
या जिओ पेमेंट्स ॲप्सच्या माध्यमातून फोन पे , गुगल पे ,पेटीएम या ॲप्स ना टक्कर देण्याकरिता नवनवीन कल्पना तसेच ऑफर्स दिले जाणार आहे , यामुळे कमी कालावधीमध्ये जिओ पेमेंट ॲप्स देखिल लोकप्रिय होईल , अशी अपेक्षा , मुकेश अंबानी यांनी व्यक्त केली आहे .
जिओ पेमेंट साउंड बॉक्स : जिओ कंपनीकडून बाजारातील छोट्या – मोठ्या दुकानांमध्ये वापरण्याकरीता साउंड बॉक्स तयार करण्याचे कामकाज सुरू आहे . ज्यामुळे छोट्या-मोठ्या दुकानदारांना पेमेंट आल्याची खात्री करण्याकरीता नेहमी मोबाईल चेक करावे लागणार नाहित .शिवाय भविष्यामध्ये जिओ फायनान्स सेवा या पेमेंट ॲप्स माध्यमातून ग्राहकांना कर्ज , मुदत ठेव यासारख्या सुविधा उपलब्ध करून दिले जाणार आहे .
भविष्यामध्ये सर्व आर्थिक व्यवहार ऑनलाइन होणार असल्याने , व ती काळाची गरज लक्षात घेता मोठ्या कंपन्या यूपीआय (UPI ) माध्यमातून पेमेंट ॲप्स तयार करण्याकडे अधिक लक्ष देत आहेत ज्यामध्ये अमेझॉन , फ्लिपकार्ट , टाटा अशा मोठ्या कंपन्या पेमेंट ॲप्स तयार करण्याकरीता विशेष लक्ष देत आहेत .