Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Modi Government Good Works ] : नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीने देशामध्ये दोन वेळा सत्ता स्थापन केली आहे , आता तिसऱ्या टर्म साठी मोदी यांच्या नेतृत्वाखाली तयारी सुरु आहे . मोदी यांनी त्याच्या काळांमध्ये अनेक उल्लेखनिक कामकाज केले आहेत , हे कि आत्तापर्यंतच्या सरकारला शक्य झाले नाहीत .
370 कलम रद्द : स्वातंत्र्यानंतर जम्मु आणि कश्मिर या राज्याला विशेष राज्याचा दर्जा देण्यात आलेला होता , या कायद्यामुळे या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अराजकता पसरली होती , शिवाय या मुद्यावर नेहमीच भारत – पाकिस्थान तसेच चीन सोबत सीमावादामुळे युद्धाचे प्रश्न उद्भवले आहेत . जम्मु आणि कश्मिला विशेष दर्जा देणेबाबतचा कलम 370 अखेर मोदी सरकारने रद्द केला आहे , हे आतापर्यंतच्या सरकारला शक्य झाले नाहीत .
देशाला जागतिक पातळीवर उच्च दर्जाचे स्थान मिळाले : मोदी यांची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढल्याने , तसेच मोंदी प्रथम पंतप्रधान झाल्यानंतर बऱ्याच देशांचा दौरा केल्याने , जागतिक पातळीवर भारत देशाचे स्थान उच्च होण्यास मदत झाली . यांमुळे विविध देशांमध्ये काम करत असणाऱ्या भारतीय नागरिकांना एक प्रकारचे आधार मिळाले आहेत , तेथिल सरकारकडून भारतीय नागरिकांना चांगली वागणुक मिळू लागली आहे .
दिल्ली ते गल्ली पर्यंत थेट लाभ : आत्तापर्यंतच्या सरकारने राबविण्यात आलेल्या विविध योजनांमध्ये गल्ली पर्यंत म्हणजे थेट नागरिकांपर्यंत मिळत नव्हते , म्हणजेच केंद्र सरकारकडून एखादी योजना राबविली गेल्यास ते थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहचत नव्हत्या . यामुळे काँग्रस सरकारच्या काळांमध्ये राबविण्यात आलेल्या आधार प्रणालीस विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी मोदी सरकारकडून वापरण्यात आल्याने , थेट लाभार्थ्यांपर्यंत लाभ मिळणे शक्य झाले आहेत .
रस्त्यांचे वेगाने कामकाज : मोदी सरकारच्या मंत्रीमंडळामधील उल्लेखनिक कामकाज करणाऱ्यांमध्ये रस्ते व वाहतुक मंत्री मा.नितीन गडकरी यांचे नाव अग्रेस्थानी घेण्यात येते . कारण मा.नितीन गडकरी यांनी देशातील रस्त्यांचे काम अत्यंत वेगाने व चांगल्या दर्जाचे काम केले आहेत , ज्यामुळे मोठ्या शहरातील प्रवास करण्याचा वेळा कमी झाले आहेत .
नोटबंदी : मोदी सरकारने केलेली नोटबंदी हा जर निर्भळ ठरला तरी , तज्ञांच्या मते बनावट नोटांना मोठ्या प्रमाणात आळा बसला आहे , कारण यापुर्वी नोटा तयार करण्यासाठी कागद हा आयत करावा लागत होता , तर नोटबंदी नंतर नोटा तयार करण्यासाठी स्वदेशी बनावटीच्या कागदांपासून नोटा तयार करण्यात येत आहेत .
उद्योगांस चालना : मोदी सरकाने उद्योगांना विशेष चालना देण्यासाठी विविध उपाय योजना तसेच काही कठोर नियमांचे शिथिलीकरण करण्यात आले , ज्यांमूळे उद्योग वाढीस विशेष चालना मिळाली , जेणेकरुन अप्रत्यक्षपणे रोजगार निर्मिती होण्यास मदत झाली आहे .
राममंदीराचे उद्धाटन : राममंदीराची निर्मिती हा एक प्रकारचा धार्मिक मुद्दा असला तरी , भारतीय जनता पक्षांच्या सत्ता असताना , राममंदीराची निर्मिती व मा.नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्धाटन झाले हे विशेष उल्लेखनिक बाब आहे .