@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ India’s 5 big tough decisions after Pahalgam terrorist attack; Pakistan also took countermeasures against India. ] : पहलगाम या ठिकाणी वार मंगळवार रोजी झालेल्या आतंकवादी हल्यामध्ये 26 निष्पाप भारतीय नागरीक मारले गेले , या क्रुर हल्यानंतर भारताने पाकिस्थानवर 05 कठोर निर्णय घेतले आहे .
हल्यानंतर भारताने घेतलेले 05 कठोर निर्णय : या दहशतवादी हल्यानंतर , भारताने दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी ऑपरेशन सुरु केले असून , 05 मोठे कठोर निर्णय घेतले आहेत . यांमध्ये पुढील 48 तासात पाकिस्थानी नागरिकांनी भारत सोडून जाण्याचे आदेश दिलेले आहेत .
तसेच दुसरा मोठा निर्णय म्हणजे सिंधु जल ( पाणी वाटप ) करार रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे . तसेच अटारी बॉर्डर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे . याशिवाय पाकिस्थानी नागरिकांना भारतामधील मंजूर करण्यात आलेला व्हिसा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे . याशिवाय भारतातील पाकिस्थानी दूतावासातील कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे .
या निर्णयानंतर पाकिस्थानचा भारतावर पटलवारीचे निर्णय : भारताने घेतलेल्या निर्णयानंतर , पाकिस्थानने देखिल पलटवारीच्या भूमिकेत निर्णय घेतले आहेत . यांमध्ये भारतामधून येणाऱ्या हवाई वाहतुकीसाठी एअर स्पेस बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे . तसेच भारतासोबतचा शिमला करार रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे , याशिवाय पाकिस्थान मधील भारतीय नागरिकांना पाकिस्थान सोडण्याच्या सुचना देण्यात आलेल्या आहेत .
तसेच वाघा बॉर्डर बंद राहणार असल्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत . या निर्णयामुळे पाकिस्थानी शेअर मार्केट कोसळला आहे . तर भारतीय शेअर बाजारावर फारसा फरक नाही पडला.
- राज्य कर्मचाऱ्यांना 3 वर्षातुन 10 दिवस मिळते या कामासाठी पगारी रजा ; जाणून घ्या वित्त विभागाचा शासन निर्णय !
- जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांकरीता महत्वपुर्ण राजपत्र निर्गमित दि.18.07.2025
- सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारचा रजेबाबत खास महत्वपुर्ण निर्णय ; संसदेत दिली माहिती !
- राज्य कर्मचाऱ्यांना “ही” योजना लागु करणेबाबत ; वित्त विभागांकडून GR निर्गमित दि.30.06.2025
- लहानपणांपासुनच इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे बालपण तर हरवतच आहे ; तसेच मुलांच्या बुद्धांक वाढीवर देखिल होतोय विपरित परिणाम !