भारतीय पोस्टाच्या या आहेत टॉप 5 गुंतवणुक योजना ; मिळतो सर्वाधिक लाभ !

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी : आपण जर पैश्याची गुंतवणुक करु इच्छित असाल तर , भारतीय पोस्ट ऑफीसच्या खाली नमुद टॉप गुंतवणुक योजनांमध्ये पैसे गुंतविले असता , आपणांस सर्वाधिक आर्थिक लाभ मिळणार आहे . भारतीय पोस्ट हे केंद्र सरकारच्या अधिनस्थ असल्याने , यामधील गुंतवणुक ही सर्वाधिक सुरक्षित गुंवणुक मानली जाते .

सुकन्या योजना : मुलीच्या जन्मानंतर वयाच्या 10 वर्षानंतर या योजनांमध्ये आपण गुंतवणुक करु शकता , या योजनांमधील गुंवणकीवर 8.2 टक्के इतका सर्वाधिक वार्षिक व्याजदर आपणांस मिळतो , या योजना अंतर्गत आपणांस 15 महिन्यांच्या कालावधीकरीता गुंतवणुक करावी लागते , तर 21 वर्षांच्या मच्युरिटी कालावधी नंतर मुद्दल + व्याजाची रक्कम प्राप्त होते . या योजनांमध्ये किमान 250/- रुपये पासुन मासिक गुंतवणुक करु शकतो .

ज्येष्ठ नागरिक बचत योजना ( SENIOR CITIZEN SAVING SCHEME ) : ज्येष्ठ नागरिक बचत योजना अंतर्गत किमान 1000/- रुपये ते कमाल 30 लाख रुपये पर्यंत गुंतवणुक करु शकता .. या योजना अंतर्गत 8.2 टक्के इतके व्याजदर मिळतो , जर आपण या योजना अंतर्गत 10 लाख रुपये गुंतवणुक केली असता , आपणांस तिमाहीला 20,499 रुपये इतका व्याज मिळेल तर वार्षिक 73,800/- रुपये इतका व्याज मिळेल तर 8 वर्षानंतर एकुण 5,90,400/- रुपये इतका व्याज + 10 लाख रुपये अशी एकुण 15 लाख 90,400 इतकी रक्कम प्राप्त होईल ..

प्रतिमहा उत्पन्न योजना ( Monthly Income Shcme ) : प्रतिमहा उत्पन्न योजना अंतर्गत कमाल 900,000/- रुपये पर्यंत गुंतवणुक करु शकता . तर किमान 1000/- रुपये गुंतवणुक करु शकता .. जर आपण या योजना अंतर्गत कमाल रक्कम 9 लाख रुपये गुंतवली असता , आपणांस प्रतिमहा 5,550/- रुपये इतकी रक्कम प्राप्त होईल . या योजना अंतर्गत गुंतवणुकीवर 7.4 टक्के इतके वार्षिक व्याजदर मिळतो .

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी : सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजना अंतर्गत कोणतीही व्यक्ती गुंतवणुक करु शकते , या योजना अंतर्गत आपणांस 15 वर्षांकरीता गुंतवणुक करावी लागते . या योजनांमध्ये किमान 500/- रुपयांपासून गुंतवणुक करावी लागते , तर एका वित्तीय वर्षांमध्ये 150,000/- रुपये इतकी कमाल  रक्कम गंतवणुक करता येते , म्हणजेच प्रतिमहा कमाल गुंतवणुक ही 12,500/- रुपये इतकी करता येईल . जर आपण या योजनांमध्ये 15 वर्षांकरीता प्रतिमहा 12,500/- रुपये गुंतवणुक केली असता , आपणांस 15 वर्षानंतर तब्बल 39,44,600/- रुपये इतकी रक्कम मिळेल , यांमध्ये 22,50,000/- रुपये आपली गुंतवणुक असेल तर एकुण 16,94,600/- रुपये इतकी व्याजाची रक्कम असेल .

महीला सन्मान बचत प्रमाणपत्र ( MAHILA SAMMAN SAVING CERTIFICATE ) : महिला सन्मान बचत प्रमाणपत्र या योजना अंतर्गत 02 वर्षे कालावधीकरीता कमाल रुपये 2 लाख इतकी रक्कम , फक्त महिलांच्या नावाने गुंतवणुक करता येते , या योजनामधील गुवणंकीवर 7.5 टक्के इतके व्याजदर मिळतो .या योजना अंतर्गत आपण किमान 1000/- रुपये तर कमाल 2 लाख रुपये इतकी रक्कम गुंतवणुक करता येते . जर 2 लाख रुपये इतकी गुंवणुक केल्यास आपणांस दोन वर्षानंतर 2,32,044 /- इतकी रक्कम मिळेल .

Leave a Comment