@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Increase in the ceiling of retirement gratuity/death gratuity on the lines of the Central Government; Revised GR issued on 04.06.2025 ] : सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचारी यांना सेवानिवृत्ती उपदान / मृत्यु उपदानाच्या कमाल मर्यादेत केंद्र शासनांच्या अधिसुचनेनुसार वाढ करणेबाबत , सार्वजनिक आरोग्य विभागांकडून महत्वपुर्ण सुधारित शासन निर्णय दिनांक 04.06.2025 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर शासन निर्णयांमध्ये नमुद करण्यात आले आहेत कि , महात्मा गांधी स्मारक रुग्णालय परळ , मुंबई येथील अधिकारी / कर्मचारी यांना केंद्र सरकारच्या श्रम व रोजगार मंत्रालयाच्या दिनांक 18.05.2010 व दिनांक 24.05.2010 रोजीच्या संदर्भाधिन अधिसूचना नुसार , सेवानिवृत्ती उपदान / मृत्यु उपदानाच्या कमाल मर्यादेत रुपये 10,00,000/- ( रुपये दहा लाभ रुपये ) अनुज्ञये करुन त्यानुसार फरकाची रक्कम पात्र अधिकारी / कर्मचारी यांना अदा करण्यास मान्यता देण्यात येत आहे .
त्याचबरोबर सदरील अधिकारी / कर्मचारी यांना केंद्र सरकारच्या दिनांक 29.03.2018 पासुन सेवानिवृत्ती उपदान / मृत्यु उपदानाच्या कमाल मर्यादा रुपये 20,00,000/- ( अक्षरी वीस लाख रुपये ) इतकी करण्यास व केंद्र शासन यापुढे ज्या – ज्या वेळी सेवानिवृत्ती उपदान / मृत्यु उपदानाच्या कमाल मर्यादेत वाढ करेल , व ती वाढ त्या- त्या वेळी अधिसुचनेच्या दिनांकापासून लागु करण्यास मान्यता देण्यात येत आहे .
सदर मर्यादेत वाढ करताना निवृत्त झालेल्या अधिकारी / कर्मचारी यांच्या प्रकरणांची सर्वंकष तपासणी वैद्यकीय अधिक्षक , महात्मा गांधी स्मारक रुग्णालय परळ मुंबई व संचालक महाराकावि सोसायटी परळ मुंबई यांच्याकडून केल्यानंतरच संबंधित प्रकरणात सेवानिवृत्ती उपदान / मृत्यु उपदान प्रदान केले जाईल अशी बाब नमदु करण्यात आलेली आहे .
हे पण वाचा : वित्त विभागांकडून अखेर महत्वपुर्ण / दिलासादायक GR निर्गमित दि.02.06.2025
तसेच राज्य सरकारने सेवानिवृत्ती उपदान / मृत्यु उपदानापोटी केलेल्या खर्चाी प्रतिपुर्ती राज्य कामगार विमा महामंडळाकडून वेळीच प्राप्त होईल , याची खातरमजा मा.आयुक्त महाराकावि सोसायटी परळ , मुंबई यांनी करुन त्याबाबतचा अहवाल शासनांस पाठविण्याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .


- राज्य कर्मचाऱ्यांना 3 वर्षातुन 10 दिवस मिळते या कामासाठी पगारी रजा ; जाणून घ्या वित्त विभागाचा शासन निर्णय !
- जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांकरीता महत्वपुर्ण राजपत्र निर्गमित दि.18.07.2025
- सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारचा रजेबाबत खास महत्वपुर्ण निर्णय ; संसदेत दिली माहिती !
- राज्य कर्मचाऱ्यांना “ही” योजना लागु करणेबाबत ; वित्त विभागांकडून GR निर्गमित दि.30.06.2025
- लहानपणांपासुनच इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे बालपण तर हरवतच आहे ; तसेच मुलांच्या बुद्धांक वाढीवर देखिल होतोय विपरित परिणाम !