@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Finally important / comforting GR issued by Finance Department on 02.06.2025 ] : राज्य शासनांच्या वित्त विभाग मार्फत दिनांक 02.06.2025 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार खुल्लर समितीने शिफारस केलेल्या पदांना सुधारित वेतनश्रेणी लागु करण्यास मंजूर आले आहे .
सदर शासन निर्णयानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , शासनाने वेतनत्रुटी निवारण समिती 2024 ने सादर केलेल्या अहवालामधील शिफारशी सदर शासन निर्णयानुसार मंजूरी देण्यात आलेली आहे . सदर समितीने शिफारशी केलेले जोडपत्र 01 ते 03 सदर शासन निर्णयांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत .
यांमध्ये जोडपत्र 01 मध्ये नमुद करण्यात आलेल्या पदांना दिनांक 01.01.2016 पासुन काल्पनिकरित्या मंजूर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत . तर प्रत्यक्ष आर्थिक लाभ हे दिनांक 01.06.2025 पासुन देण्यात यावेत , मात्र दिनांक 01.01.2016 पासुन दिनांक 31.05.2025 पर्यंत कुठल्याही संवर्गाला वरील शिफारशींमुळे थकबाकी अनुज्ञेय ठरणार नसल्याचे नमुद करण्यात आलेले आहेत .
जोडपत्र 01 नुसार जे कर्मचारी दिनांक 01.01.2016 ते दिनांक 31.05.2025 या कालावधीत सेवानिवृत्त झाले असतील , त्या कर्मचाऱ्यांची दिनांक 01.01.2016 ते दिनांक 31.05.2025 या कालावधीत सेवानिवृत्त झाले असतील , त्या कर्मचाऱ्यांची दिनांक 01.01.2016 पासुन सुधारित वेतनसंरचनेत काल्पनिक वेतननिश्चिती करण्यात यावी असे नमुद करण्यात आले आहेत .
तर दिनांक 01.01.2016 ते संबंधित कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या दिनांकापर्यंतच्या कालावधीत अनुज्ञेय वेतनवाढी विचारात घेवून निवृत्तीवेतन सुधारित करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
सुधारित निवृत्तीवेतनाचे प्रत्यक्ष लाभ दिनांक 01.06.2025 पासुन देण्यात यावेत , तर त्यापुर्वीची थकबाकी अनुज्ञेय करण्यात येवू नयेत असे सदर शासन निर्णयांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत .
याबाबतचा सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहु शकता ..