कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रिया सन 2025 बाबत महत्वपुर्ण परिपत्रक दि.05.03.2025

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Important circular regarding employee transfer process for the year 2025 dated 05.03.2025 ] : सन 2025 च्या जिल्हा अंतर्गत बदली करीता अवघड क्षेत्र घोषित करणेबाबत , राज्यातील सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदा सर्व तसेच मे.विन्सीस आय.टी सर्व्हिसेस प्रा.लि.पुणे यांच्याप्रति महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .

सदर शासन परिपत्रकानुसार नमुद करण्यात आलेले आहेत कि , सन 2025 च्या जिल्हा अंतर्गत बदलीकरीता अवघड क्षेत्र घोषित करणेबाबत , कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आलेले ओहत .

यांमध्ये नमुद करण्यात करण्यात आले आहेत कि , दिनांक 18.06.2024 रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार अवघड क्षेत्रातील शाळांची यादी दर 03 वर्षांनी माहे मार्च महिन्यात पुनर्विलोकन करुन सुधारित करण्याची तरतुद आहे . यापुर्वीची अवघड क्षेत्राची यादी सन 2022 मध्ये सुधारित करण्याची तरतुद आहे .

यापुर्वीची अवघड क्षेत्राची यादी ही सन 2022 मध्ये सुधारित करण्यात आली असल्यामुळे , सन 2025 च्या जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेकरीता सद्य स्थितीत सन 2025 स्थित अवघड क्षेत्राची सुधारित यादी प्रसिद्ध करणे आवश्यक आहे .त्यानुसार सन 2025 स्थित अवघड क्षेत्राची सुधारित यादी 15 मार्चपर्यंत घोषित करणेबाबत , सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी ..

जिल्हा परिषदांनी कार्यवाही करावी , व सदर कालावधीत अवघड क्षेत्राची सुधारित यादी घोषित न केल्यास , सन 2022 ची अवघड क्षेत्राची यादी ग्राह्य धरण्यात येईल असे नमुद करण्यात आले आहेत . तथापि याबाबत काही प्रश्न उपस्थित झाल्यास , त्याची जबाबदारी ही संबंधित जिल्हा परिषदेची राहील असे नमुद करण्यात आले आहेत .

सन 2025 स्थित अवघड क्षेत्राची सुधारित यादी 15 मार्चपर्यंत घोषत झाल्यानंतर याबाबतची माहिती ही ऑनलाईन पोर्टलवर भरण्याकरीता 08 दिवसांची मुदतवाढ देण्यात येत आहे .

आपण जर कर्मचारी निवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !

Leave a Comment