@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ 02 important GRs issued regarding service review and extension of tenure for continuation of majority of posts ] : सेवा पुनर्विलोकन व अधिसंख्य पदांना सेवेत मुदतवाढ देणेबाबत 02 महत्वपुर्ण शासन निर्णय दिनांक 06.03.2025 रोजी निर्गमित करण्यात आलेले आहेत .
01.सेवेत मुदतवाढ : सार्वजनिक आरोग्य विभाग मार्फत दिनांक 06.03.2025 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार , आरोग्य सेवा आयुक्तालय अंतर्गत महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट – अ ( एस – 20 ) मधील अधिकाऱ्यांचे वयाच्या 50/55 व्या वर्षानंतर सेवा पुनर्विलोकन करणेबाबत निर्णय घेण्यात आलेला आहे .
सदर निर्णयानुसार विभागीय पुनर्विलोकन समितीने केलेल्या शिफारशीस अनुसरुन आरोग्य सेवा आयुक्तालय अंतर्गत महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट अ मधील वैद्यकीय अधिकारी या संवर्गातील सदर निर्णयात नमुद केलेल्या 06 अधिकाऱ्यांची सेवा त्यांच्या वयाच्या 50/55 व्या वर्षी अथवा 30 वर्षे अर्हताकारी सेवा यापैकी जे अगोदर घडेल त्यानंतर चालु ठेवण्यास मान्यता देण्यात येत आहे .
02.अधिसंख्य पदांना मुदतवाढ : सामाजिक वनीकरण मजुर संवर्ग मधील 134 अधिसंख्य वनमजुर पदांना सन 2025-26 मध्ये पुढे चालु ठेवण्यास मुदतवाढ देणेबाबत महसुल व वन विभाग मार्फत मान्यता देण्यात आलेली आहे . सदर निर्णयानुसार , सामाजिक वनीकरण मजुर संवर्ग अंतर्गत 197 अधिसंख्य पदांना दिनांक 01.09.2024 ते दिनांक 28.02.2025 …
या कालावधीकरीता मुदतवाढ देण्यात आली , सदरची मुदतवाढ देताना मुदतवाढ दिलेली अधिसंख्य पदे निवृत्ती अथवा अन्य कोणत्याही कारणामुळे रिक्त झाली असल्यास सदरची पदे ही आपोआप व्यपगत होतील असे नमुद करण्यात आले आहेत . या संदर्भातील दोन्ही GR डाऊनलोड करण्यासाठी Click Here
आपण जर कर्मचारी निवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !
- राज्यातील अनुदानित शाळांना अनुदान वितरीत करण्यास प्रशासकीय मान्यता GR निर्गमित दि.21.03.2025
- अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या गट विमा योजनाच्या वर्गणीबाबत , वित्त विभागांकडून महत्वपुर्ण GR निर्गमित दि.21.03.2025
- आता जादा कामासाठी या शासकीय कर्मचाऱ्यांना अतिरिक्त सुधारित मानधन ; GR निर्गमित दि.21.03.2025
- मार्च पेड इन एप्रिल वेतन देयक अदा करणेबाबत निधीचे वितरण ; शासन निर्णय निर्गमित दि.20.03.2025
- शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे अंशदान व शासनाचा हिस्सा व कर्मचाऱ्यांच्या अंशदान यावरील व्याज रक्कम अदा करणेबाबत परिपत्रक दि.11.03.2025