@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Circular regarding precautions to be taken while submitting retirement cases of employees ] : सेवानिवृत्ती प्रकरणे सादर करताना , आक्षेप विरहीत प्रकरणे निकाली लागावेत , याकरीता सहसंचालक ( उच्च शिक्षण ) नागपुर विभाग मार्फत दिनांक 03.03.2025 रोजी महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर परिपत्रकानुसार , नमुद करण्यात आले आहेत कि , संस्था 100 टक्के अनुदानावर कोणत्या दिनांकापासुन आली , याबाबत सेवापुस्तकात सविस्तर नोंद घेवून अनुदान मंजूरीचे पत्रासह निवृत्तीवेतन मंजूर प्राधिकारणाचे 100 टक्के अनुदानाचे प्रमाणपत्र जोडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .
तसेच संस्था दिनांक 01.11.2005 नंतर 100 टक्के अनुदानावर आली असल्यास , अनुज्ञेय निवृत्तीवेतन नियमानुसार प्रकरण सादर करण्याचे निर्देश , याशिवाय पुर्वीच्या आस्थापनेवरुन राजीनामा दिल्याच्या नंतर नविन आस्थापनेवर नियुक्तीने रुजु झाल्यावर पुर्वीच्या आस्थापनेवरील सेवा नविन नियुक्तीला सक्षम प्राधिकाऱ्याकडून जोडून ..
घेतल्याशिवाय ती नियमित सेवा होणार नाही , असे निदर्शनास आले की पुर्वी आस्थापनेवर राजीनामा दिल्यावर नविन आस्थापनेवार पुर्वीचे वेतन संरक्षित करुन वेतन निश्चिती करण्यात येते व सेवा नियमित झाल्याचे दर्शविल्या जाते , परंतु एकदा राजीनाम दिल्याच्या नंतर पुर्व पदाचा हक्क गमावल्या जाते . तसेच पुर्व आस्थापनेवरुन राजीनामा न देता कार्यमुक्त होणे आवश्यक आहे असे नमुद करण्यात आले आहेत .
तसेच आर्थिक वर्ष संपल्यानंतर दिनांक 01 एप्रिल ते दिनांक 31 मार्च या कालावधीतील सेवा कार्यालय प्रमुखाने प्रमाणित केल्याची नोंद सेवा पुस्तकात घेणे आवश्यक असल्याचे नमुद करण्यात आले आहेत .
तसेच निवृत्तीवेतन नियम तथा राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना अंतर्गत कर्मचाऱ्याने निवृत्तीवेतन , मृत्यु नि सेवा उपदान , अंशराशीकरण , गटविमा योजना अपघात विमा , भविष्य निर्वाह निधी , राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना अंतर्गत आवश्यक नामनिर्देशन भरुन त्याची सेवा पुस्तकात नोंद घेणे आवश्यक असेल .
तसेच निवृत्ती वेतन प्रकरणे सादर करतांना संबंधित कर्मचाऱ्याचा फार्म क्रमांक नोंदविणे आवश्यक असेल असे नमुद करण्यात आले आहेत .

आपण जर कर्मचारी निवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !
- जुनी पेन्शन , शिक्षण सेवक रद्द करा आदी मागणीसाठी धरणे आंदोलन ; जाणून घ्या सविस्तर वृत्त !
- आगाऊ वेतनवाढी मंजूर करणेबाबत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ; GR दि.17.03.2025
- राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना घरबांधणी अग्रिम व मोटार वाहन खरेदी अग्रिम वाटप करणेबाबत महत्वपुर्ण 02 GR निर्गमित !
- महाराष्ट्र राज्य शासनामार्फत खास शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येतात ह्या महत्वपुर्ण योजना 2025
- आठवा वेतन आयोग व महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी ; जाणून घ्या काही महत्वपुर्ण बाबी !