@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ These 06 new sites from India have been included in the World Heritage List ] : जागतिक वारसा यादीमध्ये भारतातील नविन 06 नविन स्थळांचा समावेश करण्यात आला आहे , सदर स्थळ कोणते व त्याचे महत्व नेमके काय ? याबाबत सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे पाहुयात ..
चौसष्ट योगिनी मंदीर : हे मंदीर मध्य प्रदेश राज्यातील मुरैना या जिल्ह्यामधील पाडोली गावात स्थित आहे , हे मंदीर धार्मिक केंद्राचे प्रमुख केंद्र मानले जाते . हे मंदीर सुमारे 130 फुट व्यास असणारे वर्तुळाकर रचना मुळे अतिसुंदर रमणीय दृश्य दिसते .
मुदुमल मेगालिथिक मेन्हिर्स : तेलंगणा राज्यात , नारायणपेट जिल्ह्यांमध्ये मुदुमल या गावाच्या नैऋत्य दिशाला कृष्णा नदीच्या काठावर हे 3500 वर्षे जुने मेगालिथिक मेन्हिर्स् स्थ तब्बल 89 एकरांमध्ये पसले आहेत . नीलुरल्ला तिम्मप्पा या मध्ये मेन्हिर्सशिवाय इतर दगडी वर्तुळे , समाधी स्थळे तसेच शिलालेख या स्थळावर आढळून येतात , या ठिकाणी मेन्हिर देवी येलम्मा म्हणून पुजली जाते , यामुळे या स्थळाचे महत्व सांस्कृतिक व आध्यात्मिक महत्व अखोरेखित होते .
बुंदेलांचे किल्ले – राजवाडे : मध्य प्रदेश व उत्तर प्रदेश मध्ये स्थित बुंदेलखंड प्रदेशातील राजा महाल , जहांगिर महाल , झांसी किल्ला , ढुबेला पॅलेस , गढकुंदर किल्ला ,दतिया पॅलेस या 06 स्थळांचा यांमध्ये समावेश करण्यात आला आहे .बुंदेलांची सांस्कृतिक परंपरा व राजकिय इतिहासाचे प्रतिक मानले जाते , यामधील बुंदेला स्थापत्यशास्त्राचे महत्व त्यांच्या शैलीत संरक्षणात्मक तंत्र व रोजेशाही वैभव यांचा संगम असणारे आढळून येतात .
कांगर व्हॅली : छत्तीसगड राज्यातील बस्तर जिल्ह्यात जगदलपुर या ठिकाणी कांगर व्हॅली राष्ट्रीय उद्यान सुमारे 200 चौरस किलोमीटर क्षेत्रफळांमध्ये विस्तारलेले आहेत . या उद्यानामध्ये पानगळीचे जंगले आढळून येतात , तसेच बांबूचे मोठ्या प्रमाणात झाले आहेत . या उद्यानामध्ये भुमिगत चुनखडीच्या गुहा आढळून येतात , या गुहांमध्ये स्थलॅक्टाइट व स्टॅलॅग्माइट संरचनांमध्ये आहेत .
अशोकाचे शिलालेख : मध्य प्रदेशात असणारे अशोकाचे सुमारे 2200 वर्षापुर्वीचे शिलालेख आजही धर्म , प्रशासन व शांततेचे संदेश देते . या शिलालेखाचा समावेश करण्यात आलेला आहे .
गुप्तकालीन मंदिरे : उत्तर भारतातील भारतीय मंदिरे यांमध्ये बौद्ध व हिंदु प्रभावाचे संगम असणारे दृश्य आढळून येतात . यामध्ये मुख्य देवस्थान , सभागृह , मुख्यमंडप , प्रवेश पोर्च यांचा समावेश .
- पाकिस्थानवर केलेल्या ऑपरेशन सिंदुर सर्जिकल स्ट्राईक बाबत सविस्तर A TO Z माहिती !
- सोने खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी ; युद्धामुळे सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण , प्रति तोळा 69,250/-रुपये भाव !
- महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांना हे 02 आर्थिक लाभ एकदाच ; पगारात मोठी वाढ !
- दिनांक 05 मे रोजीच्या काही प्रमुख घडामोडी ; जाणून घ्या सविस्तर बातम्या !
- राज्यातील कंत्राटी / रोजंदारी कर्मचाऱ्यांना खुशखबर ; तब्बल 50 हजार कंत्राटी / रोजंदारी कर्मचारी होणार राज्य शासन सेवेत नियमित – कोर्टाचे निर्देश !