कर्मचाऱ्यांचे माहे मार्च पेड इन एप्रिल वेतन देयकाबाबत आत्ताची मोठी अपडेट !

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Big update regarding payment of employees’ salaries for March and April ] : कर्मचाऱ्यांचे माहे मार्च पेड इन एप्रिल 2025 चे वेतन देयक सादर करताना , करावयाची कार्यवाही बाबत प्रशासनांकडून परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .

सदर परिपत्रकानुसार , वेतन देयक सादर करण्याचे वेळापत्रक सादर करण्यात आले आहेत . यांमध्ये नमुद करण्यात आले आहेत कि , कि मुख्याध्यापक यांनी डीडीओ – 02 कडे देयके फॉरवर्ड करण्याची अंतिम दिनांक ही 28 मार्च 2025 अशी असेल .

त्यानंतर हायस्कूल मुख्याध्यापक / गटशिक्षणाधिकारी यांनी हार्ड कॉपी प्रतिस्वाक्षरीस्तव पंचायत समिती स.लेखा अधिकारी यांना सादर करण्याची मुदत 01.04.2025 अशी असेल , तर पंचायत समिती स.लेखा अधिकारी यांनी देयके तपासणी करुन हायस्कूल मुख्याध्यापक / गट शिक्षणाधिकारी यांना प्रतिस्वाक्षरीसह परत घेण्याचा अंतिम दिनांक 03.04.2025 अशी असणार आहे .

तसेच हायस्कूल मुख्याध्यापक / गटशिक्षणाधिकारी यांनी हार्ड कॉपी लेखा शाखा शिक्षण विभाग येथे सादर करण्याचा अंतिम दिनांक 04.04.2025 अशी असणार आहे .

हे पण वाचा : शिक्षक , लिपिक व शिपाई पदासाठी थेट पदभरती 2025

सदर देयके सादर करताना ज्या कर्मचाऱ्यांना प्रान नंबर मिळाले असतील अशा कर्मचाऱ्यांना माहे मार्च महिन्याच्या वेतनामधून नियमितपणे एनपीएस रक्कम कपात करण्यात यावी असे नमुद करण्यात आले आहेत . तसेच माहे फेब्रुवारी 2025 च्या वेतनामधून देण्यात आलेल्या महागाई भत्ता फरक आपोआप शुन्य होईल , याबाबतची खात्री करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .

आपण जर कर्मचारी निवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !

Leave a Comment