कुटुंब निवृत्तीवेतन , मृत्यु उपदान व रुग्णता निवृत्तीवेतन बाबत अत्यंत महत्वपुर्ण GR निर्गमित दि.25.03.2025

Spread the love

@marathipepar वंदना पवार प्रतिनिधी [ Very important GR regarding family pension, death gratuity and sickness pension issued on 25.03.2025 ] : परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना / राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्याचा सेवा कालावधीत मृत्यु झाल्यास , त्याच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्तीवेतन व मृत्यु उपदान व रुग्णता सेवानिवृत्ती व सेवानिवृत्ती उपदान तसेच शासन सेवेतुन होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान मंजूर करण्याबाबत , आ.वि.विभागांकडून दिनांक 25 मार्च 2025 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

सदर शासन निर्णयानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , दिनांक 01 नोव्हेंबर 2005 रोजी व त्यानंतर आदिवासी विकास विभाग अंतर्गत राज्यात स्वयंसेवी संस्था द्वारा चालविण्यात येणाऱ्या अनुदानित आश्रमशाळेतील शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी जो परिभाषित अंशदान निवृत्ती योजना / राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीचा सदस्य आहे अशा ..

यांमध्ये शिक्षके / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा सेवेत असताना मृत्यु झाल्यास त्यांच्या कुटुंबाला कुटुंब निवृत्तीवेतन व मृत्यु उपदान .तसेच रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यास रुग्णता निवृत्तीवेतन व सेवानिवृत्ती उपदान लागु करण्यात येत आहे . त्यानुसार सदर कुटुंब निवृत्तीवेतन धारकास व रुग्णता निवृत्तीवेतन धारकास महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1982 मधील तरतुदीप्रमाणे कुटुंब निवृत्ती वेतन / रुग्णता निवृत्ती वेतन लागु होणार आहे .

तसेच अनुदानित आश्रमशाळेतील सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान लागु करण्यात येत आहे .वरील निर्णयानुसार प्रदान करण्यात येणाऱ्या सेवानिवृत्ती उपदान व मृत्यु उपदानाच्या प्रयोजनार्थ सद्य: स्थितीत महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1982 मधील तरतुदी लागु राहणार आहेत .

हे पण वाचा : शिक्षक , लिपिक व शिपाई पदासाठी थेट पदभरती 2025

त्याचबरोबर आदिवासी विकास विभाग अंतर्गत राज्यात स्वयंसेवी संस्था द्वारा चालविण्यात येणाऱ्या अनुदानित आश्रमशाळेतील शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान प्रदान करण्यात येत नाही , सानुग्रह अनुदानासाठी प्राप्त झालेले अर्ज विचारात घेण्यात येवू नयेत असे नमुद करण्यात आले आहेत .

या संदर्भातील सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी Click Here

आपण जर कर्मचारी निवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !

Leave a Comment