@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ GR issued regarding transfer of employees’ contribution and interest and government’s share amount to NPS ] : कर्मचाऱ्यांचे अंशदान व शासनाचा हिस्सा व कर्मचाऱ्यांच्या अंशदान यावरील व्याज रक्कम ही राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेमध्ये ( NPS ) वर्ग करणे करीता निधी वितरीत करणेबाबत शालेय शिक्षण व क्रिडा विभाग मार्फत दिनांक 06 मार्च 2025 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
जिल्हा परिषदा , मान्यता प्राप्त खाजगी अनुदानित प्राथमिक , माध्यमिक , उच्च माध्यमिक तसेच अध्यापक विद्यालयातील 100 टक्के अनुदानित पदावरील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी लागु असणारी परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना केंद्र सरकारच्या राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेत समाविष्ट करण्याची कार्यपद्धती दिनांक 19.09.2019 रोजीच्या निर्णयानुसार नमुद करण्यात आलेली आहे .
त्याचबरोबर जिल्हा परिषद तसेच मान्यता प्राप्त खाजगी अनुदानित प्राथमिक , माध्यमिक , उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना अंतर्गत जमा असणारी रक्कम ही राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना खाली वर्ग करण्याकरीता नविन लेखाशिर्ष उघडण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे .
तसेच सन 2024-25 मध्ये लेखाशिर्ष 83420266 मधील अर्थसंकल्पीय तरतुदीमधून 30 टक्के निधी ही वितरीत करण्यात आलेली आहे . तसेच सन 2024-25 या आर्थिक वर्षाकरीता सदर निर्णयांमध्ये नमुद करण्यात आलेल्या विवरणपत्रानुसार , तरतुद करण्यात आलेली आहे . सदर तरतुदीमधून , वितरण प्रणाली द्वारे आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांना वितरीत करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे .
सदरची रक्कम ही शासकीय कर्मचाऱ्यांकरीता परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना , परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना , तसेच मान्यता प्राप्त व अनुदानित प्राथमिक शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची जमा झालेली रक्कम राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना खाली वर्ग करणे या लेखाशिर्षाखाली ..
तसेच जिल्हा परिषदेकडील शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची जमा झालेली रक्कम राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना खाली वर्ग करणे अशा लेखाशिर्षानिहाय निधीचे वितरण करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे .
या संदर्भातील GR डाऊनलोड करण्यासाठी शासन निर्णय (GR)
आपण जर कर्मचारी निवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !
- राज्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतनाचा मसुदा ; समान काम – समान वेतन लागु होणार !
- कर्मचाऱ्यांचे माहे मार्च महिन्यांचे वेतन गुढीपाडवा , रमजान ईद सणापुर्वी दि.25 मार्चला अदा करणेबाबत आत्ताचे नविन परिपत्रक दि.12.03.2025
- Good News : कर्मचाऱ्यांची थकबाकी ही व्याजासह दि.25 मार्च 2024 पर्यंत जमा करणेबाबत परिपत्रक निर्गमित दि.11.03.2025
- कर्मचाऱ्यांच्या वेतनाकरीता निधीचे वितरण ; शासन निर्णय निर्गमित दि11.03.2025
- पुर्व प्राथमिक व इ.1 ली मधील शाळा प्रवेश करीता किमान वय निश्चित करणेबाबत परिपत्रक निर्गमित दि.10.03.2025